विदेशात राहण्यासाठी सरकार देतंय मोफत घर अन् पैसा; जाणून घ्या ऑफर नेमकी काय?

World News : परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. काहींना प्रवास करायचा असतो तर काहींना तिथे कायमचे राहायचे असते. परंतु व्हिसा, कागदपत्रे, वयोमर्यादा, कौशल्ये आणि विविध प्रक्रियांमुळे हे स्वप्न अपूर्ण राहते. पण आता अशी तीन परदेशी शहरे आहेत जी तुम्हाला तिथे स्थायिक होण्याची संधीच देत नाहीत तर त्यासाठी पैसेही देत आहेत.
कुणी दिली ऑफर
कंटेंट क्रिएटर आणि फायनान्स एक्सपर्ट कॅस्पर ओपाला यांनी अलीकडेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी अशा तीन शहरांबद्दल माहिती दिली आहे जिथे सरकार स्वतः लोकांना बोलावत आहे आणि त्या लोकांना सरकारतर्फे आर्थिक मदत देखील दिली जात आहे.
अँटिकिथेरा बेट, ग्रीस
ग्रीसमधील हे एक लहान बेट आहे जिथे सध्या फक्त 39 लोक राहतात. हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. येथील पांढऱ्या इमारती, निळा समुद्र, गुहा आणि शांत वातावरण सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करेल.
स्वतःहून अमेरिका सोडा अन् 1000 डॉलर मिळवा; ट्रम्प सरकारची अवैध प्रवाशांना खास ऑफर
येथे तुम्हाला काय मिळेल?
येथे स्थायिक होण्यासाठी 5 कुटुंबांची निवड केली जाईल. त्यांना दरमहा 600 डॉलर्स (सुमारे ₹50,000) तीन वर्षांसाठी दिले जातील. राहण्यासाठी घर आणि जमिनीचा तुकडा देखील मिळेल.
जर तुमच्याकडे बेकरी चालवणे, मासेमारी करणे किंवा इतर स्थानिक व्यवसाय करणे यांसारखे विशेष कौशल्य असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल. निवडीसाठी मुलाखत देखील घेतली जाईल.
अल्बिनेन, स्वित्झर्लंड
हे एक अतिशय सुंदर गाव आहे जे त्याच्या शांत वातावरणासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथील लोकसंख्या कमी होत आहे म्हणून सरकार आता येथे स्थायिक होणाऱ्यांना लाखो रुपयांची आर्थिक मदत देत आहे.
येथे तुम्हाला काय मिळेल?
एका कुटुंबाला एकूण $60,000(सुमारे ₹50 लाख) पर्यंत मिळू शकतात. एका व्यक्तीला $26,800 (सुमारे ₹22 लाख) मिळू शकतात. प्रत्येक मुलासाठी वेगळे $10,700 (सुमारे ₹9 लाख). म्हणजेच 4 जणांच्या कुटुंबाला सुमारे 47 लाख रुपयांची मदत मिळू शकते. ही योजना विशेषतः तरुण जोडप्यांसाठी आणि कुटुंबांसाठी आहे.
प्रेसिस, इटली
हे इटालियन शहर आता एका नवीन सुरुवातीसाठी सज्ज आहे. येथे मोठ्या संख्येने घरे रिकामी पडली आहेत आणि प्रशासनाला त्यांचे पुनर्वसन करायचे आहे.
येथे तुम्हाला काय मिळेल?
येथे स्थायिक होण्यासाठी 30,000 डॉलर्स (सुमारे 25 लाख रुपये) दिले जात आहेत.
ही रक्कम दोन भागात दिली जाईल: पहिला भाग जुने घर खरेदी करण्यासाठी आणि दुसरा भाग त्याच्या दुरुस्तीसाठी.हे शहर विशेषतः कायमचे स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या लोकांना आमंत्रित करत आहे.
Earthquake in Italy : इटलीत हादरली; 4.8 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का
हे देश पैसे का देत आहेत?
या शहरांची लोकसंख्या सतत कमी होत आहे आणि तरुण लोक तिथून स्थलांतर करत आहेत. म्हणूनच हे देश आता बाहेरून लोकांना आमंत्रित करून त्यांची लोकसंख्या संतुलित करू इच्छितात आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करू इच्छितात.