Download App

भारतातील निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेपाचा प्रयत्न; रशियाचा खळबळजनक दावा

अमेरिका भारताच्या लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न म्हणजे भारताच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करण्याच्या मोहिमेचा भाग आहे.

Russia Claims us trying to interfere in Indian General Election : भारतात लोकसभा निवडणुकांची धामधूम (Lok Sabha Election) सुरू आहे. पहिल्या तीन टप्प्यातील मतदान झालं आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे. भारतातील या निवडणुकांबाबत रशियाने खळबळजनक (Russia) दावा केला आहे. अमेरिका भारताच्या लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न म्हणजे भारताच्या अंतर्गत प्रकणात हस्तक्षेप करण्याच्या मोहिमेचा भाग आहे, असेही रशियाने म्हटले आहे. रशियाच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोवा यांच्या म्हणण्यानुसार अमेरिका संसदीय निवडणुकांना अधिक जटील करण्यासाठी भारताच्या राजकीय परिस्थितीला असंतुलित करण्याच्या प्रयत्नात आहे.

तुम्ही चाट पडाल! मोदींनीच पुतीनला फोन लावून रशिया-युक्रेन युध्द…; अजितदादांकडून मोदीचं कौतुक

भारतातील निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप होत आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर जखारोवा म्हणाल्या, होय मला वाटतं की भारतातील लोकसभा निवडणुका अधिक जटील करण्याची अमेरिकेची इच्छा आहे. भारताच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करण्याच्या मोहिमेचा हा एक भाग आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकेकडून खरंच अशा पद्धतीने मोहिम राबवली जात आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, याआधी भारताने अमेरिकी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता आयोगावर (यूएससीआयआरएफ) भारताच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप आणि वार्षिक अहवालाच्या नावाखाली दुष्प्रचाराचा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. या प्रकारावर भारताने कठोर शब्दांत टीका केली होती. अमेरिकेचा हा आयोग राजकीय अजेंडा असणारी पक्षपाती संघटना म्हणून ओळखली जाते. वार्षिक अहवालाच्या नावाखाली भारताविरोधात प्रचार करण्याचं काम या आयोगाकडून केलं जातं. भारतातील विविध, बहुलतावादी आणि लोकतांत्रिक लोकआचरणाला समजून घेण्याचा प्रयत्न हा आयोग करील याची आम्हाला अपेक्षा नाही, अशी प्रतिक्रिया विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली होती.

Russia-Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचा हॅरि पॉटर कॅसल आगीच्या भक्ष्यस्थानी; 4 जणांचा मृत्यू

जगातील सर्वात मोठ्या निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत, असेही जयस्वाल म्हणाले होते. यूएससीआयआरएफने आपल्या वार्षिक अहवालात धार्मिक स्वातंत्र्याबाबतीत भारतावर टीका केली होती. यानंतर आता पुन्हा हा मुद्दा रशियाच्या दाव्याने चर्चेत आला आहे. रशियाच्या या दाव्यावर अमेरिकेकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. यावर अमेरिकी सरकारकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

follow us