DCM Ajit Pawar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी जोरदार तयारी सुरू केलीय. पुणे जिल्ह्यातील भाजपचे काही पदाधिकारी राष्ट्रवादीत (NCP)घेतलेत. भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे, भूविकास बँकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर, रोहन सुरवसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. यावेळी अजित पवार यांनी आपल्या भाषणात जोरदार टोलेबाजी लगावली आहे. राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवारांच्या (Sharad Pawar) नातेसंबंधावर ते बोलले आहेत. तर शिरुरचे माजी आमदार अशोक पवारांवर अजितदादांनी निशाणा साधला.
Sonam Wangchuk : वांगचुक यांची NGO नेमकं काय करते?, रद्द झालेलं लायसन्स पुन्हा कसं मिळणार?
आता आपल्यालाच पांघरूण घालावे लागते-अजितदादा
अजित पवार म्हणाले, तुम्हाला कळतं का ? मागचा अजित पवार आणि आताचा अजित पवार फार फरक झालाय. वय वाढतं तसं आपल्याला बदलावं लागतं. आता मॅच्युरिटी येत आहे. त्यामुळे माझ्याकडे यायला संकोच करू नका. पूर्वी आपण काही केलं तरी आपल्यावर पांघरून घालण्यासाठी साहेब (शरद पवार) असायचे. आता आपल्यालाच पांघरून घालावे लागते, असे मिश्किलपणे ते म्हणाले. (ajit-pawar-spoken-about-his-relationship-with-ncp-chief-sharad-pawar)
ब्रेकिंग : लडाख हिंसाचार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक
दिल्लीमध्ये जावून कुणाला काही विचारावे लागत नाही
दिल्लीमध्ये जावून मला कुणाला विचारून काही करावं लागत नाही. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार) हे दिल्लीत निर्णय घेतात. आम्ही मुंबईत राहतो, मी पुण्यात असतो. इथे बसूनच आम्हाला निर्णय घ्यावा लागतो. चुलत्या-पुतण्याचे मला नका सांगू. मागच्या पिढीचे, आताच्या आणि पुढच्या पिढीचे काही सांगू नका, असे अजित पवार म्हणाले.
बिचारा पुण्याच्या पालकमंत्रिपदाचे स्वप्न बघत होता
शिरूरमध्ये मला माझी भावकीच (माजी आमदार अशोक पवार) सोडून गेली. तो तर बिचारा पालकमंत्रिपदाची स्वप्नं बघत होता. त्याला वाटलं सगळीच अजितदादांसोबत गेलीत, आता आपण इकडं साहेबांबरोबर राहिलो तर आपलं सरकार येणार आणि आपणच पुण्याचा पालकमंत्री होणार असं त्याला वाटत होते. परंतु मी त्याला सांगून पाडलं आहे, असा निशाणा अजित पवारांना शिरुरचे माजी आमदार अशोक पवारांवर साधलाय.