New SIM Card Rules : नवीन सिम कार्ड घेण्याची प्रक्रिया आता अधिक कडक होणार आहे. दूरसंचार विभागाने (DoT) ग्राहकांच्या ओळखीची खात्री करण्यासाठी पडताळणी प्रक्रियेत बदल केले आहेत. त्यानुसार, नवीन सिम कनेक्शन घेताना केवळ KYC, कागदपत्रे सादर करून प्रक्रिया पूर्ण होणार नाही, तर ग्राहकाची बायोमेट्रिक पडताळणीही केली जाऊ शकते.
या पडताळणीमध्ये ग्राहकाच्या बोटांचे ठसे, चेहऱ्याची ओळख किंवा डोळ्यांच्या बाहुलीशी संबंधित माहितीचा वापर केला जाऊ शकतो. या माध्यमातून सिम कार्ड घेणारी व्यक्ती आणि सादर केलेली ओळख यांच्यातील ताळमेळ अधिक अचूकपणे तपासण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नवीन सिमपुरताच नियम मर्यादित नाही
नवीन नियमांचा परिणाम केवळ नवीन सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांपुरता मर्यादित राहणार नाही. विद्यमान ग्राहकांच्या माहितीमध्ये बदल करताना, सिम कार्ड निष्क्रिय करताना किंवा पुन्हा ओळख पडताळणीची गरज भासल्यासही बायोमेट्रिक पडताळणी लागू होऊ शकते.
सरकारकडून हा बदल का करण्यात आला?
मोबाईल क्रमांकाचा वापर आता केवळ फोन कॉल किंवा इंटरनेटसाठी होत नाही. बँकिंग व्यवहार, UPI पेमेंट, OTP आणि विविध डिजिटल सेवांसाठीही मोबाईल नंबर महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे एखाद्या नंबरचा वापर नेमकी कोणती व्यक्ती करत आहे, याची अचूक ओळख असणे आवश्यक आहे.
बनावट ओळख रोखण्यावर भर
बनावट कागदपत्रे किंवा चुकीच्या नावाने सिम कार्ड मिळवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी नवीन पडताळणी प्रक्रिया महत्त्वाची ठरू शकते. बायोमेट्रिक तपासणीमुळे ग्राहकाची ओळख अधिक विश्वासार्ह पद्धतीने निश्चित करण्यास मदत होईल.
दीपिका पादुकोण पूर्ण कथा ऐकल्याशिवाय कधीही कोणत्याही चित्रपटासाठी कमिटमेंट करत नाहीत
त्यामुळे नवीन सिम कार्ड घेण्यापासून ते विद्यमान कनेक्शनमधील माहिती अपडेट करण्यापर्यंत ग्राहकांना अधिक काटेकोर ओळख पडताळणी प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते.
किती सिमकार्ड स्वतःच्या नावावर ठेवू शकाल?
नवीन नियमानुसार भारताच्या बहुतांश भागातील एका व्यक्तीजवळ फक्त 9 सिमकार्ड ठेवता येणार आहे. तर जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि ईशान्य भारतातील क्षेत्रात एका व्यक्तीजवळ सहा सिम कनेक्शन ठेवता येणार आहेत. मग ते सिम कार्ड वेगवेगळ्या कंपनीचे असले तरी एका व्यक्तीच्या नावे 9 किंवा 6 सिम कनेक्शनच असले पाहिजे.
