तुमचं जु्नं सिमकार्ड बंद पडणार?; देशहित समोर ठेवत केंद्र सरकार सर्जिकल स्ट्राईकच्या तयारीत…

Govt Plan to Replace Old Sim Card : जर तुमच्याही फोनमध्ये जुने सिमकार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्वाची आहे. केंद्र सरकार मोबाइल फोनमधील जुनेस सिमकार्ड बदलण्याचा विचार करत आहे. यामागे कारणही आहे. खरंतर जुने जे सिमकार्ड आहेत त्यात काही चीप या चीनमधील आहेत अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना समजली आहे. नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटर (NCSC) आणि गृह मंत्रालयाद्वारे केलेल्या तपासानंतर काळजी वाढली आहे. त्यामुळे जुने सिमकार्ड बदलण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहेत.
बैठकीत काय चर्चा
मिंटच्या एका रिपोर्टनुसार नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटरने रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआय या दूरसंचार कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि दूरसंचार मंत्रालयाचे प्रतिनिधी यांच्याबरोबर एक बैठक घेतली. या बैठकीत टेलिकॉम उपकरणांच्या खरेदी प्रक्रियेतील त्रुटींवर चर्चा करण्यात आली. तसेच जुने सिमकार्ड बदलण्यासाठी एक निश्चित प्रक्रिया काय असावी यावरबी चर्चा झाली.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या पाच मोठ्या घोषणा कोणत्या? वाचा एका क्लिकवर….
राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करता केंद्र सरकारने हुवोई आणि जेडटीई यांसारख्या चिनी कंपन्यांवर बंदी घातली आहे. आता राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी नियम तयार केले आहेत. टेलिकॉम उपकरणांची आयात, उपकरणे विक्री किंवा त्यांचा वापर करण्याआधी परीक्षण आणि प्रमाणन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
सिमकार्डमध्ये चिनी चीप कसे आले
दूरसंचार कंपन्या त्यांच्यासाठी सिमकार्ड खरेदी करण्याचे काम वेंडर्सना देतात. हे पुरवठादार विश्वासपात्र आणि नोंदणीकृत असतात. या पुरवठादारांकडून व्हिएतनाम आणि तैवान यांच्याकडून चीप खरेदी केल्या जातात. यानंतर भारतात कार्ड असेंबल आणि पॅकिंग केले जातात. पुढील टप्प्यात या सिमकार्ड्सवर सिरियल नंबर टाकले जातात. यानंतर पुरवठादारांकडून सिमकार्ड टेलिकॉम कंपन्यांना पुरवले जातात.
अशी सगळी प्रक्रिया असताना काही पुरवठादारांनी त्यांच्या विश्वासार्ह सोर्स सर्टिफिकेशनचा गैरवापर केला. सुरुवातीला त्यांनी दावा केला की त्यांच्याकडील सिमकार्ड चीप अधिकृत सप्लायर्सकडून खरेदी करण्यात आले होते. परंतु, नंतर तपासात धक्कादायक माहिती समोआर आली. यातील काही चीप चीनमधून आल्याची माहिती उघड झाली.
16 वर्षांखालील युजर्सला इन्स्टाग्राम ‘लाईव्ह’ला रेड सिग्नल! मेटाचा कडक नियम, वाचा सविस्तर…
या सिमकार्ड्समध्ये असू शकतात चीनी चीप
मार्च 2021 मध्ये दूरसंचार विभागाने (DoT) युनिफाअड एक्सेस सर्व्हिस लायसेंसमध्ये बदल केले होते. टेलिकॉम ऑपरेटर्स अविश्वासनीय विक्रेत्यांकडून उपकरण खरेदी करू नयेत यासाठी हा बदल करण्यात आला होता. आता तपासात समोर आले आहे की काही विक्रेत्यांनी आपल्या ट्रस्टेड सोर्स सर्टिफिकेशनचा फायदा घेतला. ज्यावेळी दूरसंचार विभागाने बदल केले होते त्यावेळी खरेदी करण्यात आलेल्या सिमकार्ड्सवर याचा परिणाम होऊ शकतो. याचाच अर्थ असा की 2021 च्या आधी आणि नंतरच्या सिमकार्ड्समध्ये चीनी चीप असू शकतात.