गणेशोत्सवाआधीच पुण्यात मोठी कारवाई; तब्बल 3788 सिमकार्ड अन् लॅपटॉप जप्त
Pune News : महाराष्ट्राला गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. या गणेशाच्या स्वागताचीच (Ganesh Festival 2024) तयारी सुरू असताना पुण्यातून एक (Pune News) धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पु्ण्यात मोठी कारवाई केली आहे. कोंढवा भागात छापेमारी केली. येथून एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून तब्बल 3788 सिम कार्ड, लॅपटॉप आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू असल्याची धक्कादायक माहितीही आता उघड झाली आहे.
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
कोंढव्यातील मिठानगर येथे असलेल्या एमए कॉम्प्लेक्स परिसरात अनधिकृत एक्सचेंज सेंटर सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. दहशतवाद विरोधी पथकाने येथे छापा टाकला. या प्रकरणाचा दहशतवादी विरोधी पथक सध्या तपास करत असून ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाकडे कसून चौकशी केली जात आहे. मिठानगर येथे सुरू असलेल्या या सेंटरला कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. गुप्त सूत्रांकडूनच पथकाला या प्रकाराची माहिती समजली होती. त्यानंतर आज पथकाने या ठिकाणी छापा टाकला. या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून केला जात आहे. या प्रकरणी पथकाने एका जणाला ताब्यात घेतले आहे.
या छाप्यात पथकाने 3788 सिमकार्ड, सात सिम बॉक्स, वाय फाय आणि सिमबॉक्स चालवण्यासाठी वापरण्यात येणारा अँटेना असे साहित्य जप्त केले आहे. ताब्यात घेतलेल्या युवकाकडे चौकशी केली जात आहे. या चौकशीतून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या या कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
पुण्यातील बर्गर किंगच्या अडचणी वाढल्या; पुणे ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला मुंबई HC ची स्थगिती