मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत FSUच्या लोगोचे अनावरण; जेआयटी-फ्युएलमध्ये सामंजस्य करार

Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जेआयटी महाविद्यालयातील भेटीदरम्यान FSUच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जेआयटी महाविद्यालयातील भेटीदरम्यान FSUच्या लोगोचे अनावरण

Devendra Fadnavis Unveils FSU Logo; JIT and FUEL Sign MoU: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नागपूर येथील ‘जेआयटी’ महाविद्यालयाच्या भेटीदरम्यान ‘फ्युएल स्किलटेक अँड आंत्रप्रेन्युअरशिप युनिव्हर्सिटी’च्या (एफएसयू) अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले. कौशल्य विकास व उद्यमशीलता शिक्षणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. याच वेळी जेआयटी आणि ‘फ्युएल’ यांच्यात कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

भारत-वेस्ट इंडिज ODI आणि T20I मालिका 27 सप्टेंबरपासून; कुठे, कधी होणार सामने? जाणून घ्या

नागपूर येथील जेआयटी महाविद्यालयात ‘फ्युएल’तर्फे सीएसआर उपक्रमांतर्गत ‘एडब्ल्यूएस क्लाउड कौशल्य प्रशिक्षण’ राबवले जाते. या उपक्रमाची पाहणी आणि भेटीदरम्यान एफएसयूच्या अधिकृत लोगोचे लोकार्पण पार पडले. हा लोगो कौशल्य, नवोन्मेष आणि नवउद्योजकतेचे प्रतीक असून, तो विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची ओळख असणार आहे.

मोठी बातमी : एफडीएच्या पथकाकडून ट्रकचा सहा तास थरारक पाठलाग; 1 कोटींचा गुटखा पकडला

युवकांसाठी भविष्योन्मुख शिक्षण व कौशल्य विकास अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने जेआयटी आणि फ्युएल यांच्यात सहकार्याचा करार करण्यात आला. या वेळी ‘एसएससीटी’चे अध्यक्ष महेश साधवानी, सचिव वीरेंद्र कुकरेजा आणि ‘फ्युएल’चे अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे उपस्थित होते.

महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम क्रमांक 23, 2026 अन्वये स्थापन झालेले हे विद्यापीठ उच्च शिक्षणात राज्याला राष्ट्रीय पातळीवर आघाडीवर नेण्याच्या शासनाच्या ध्येयाचा भाग आहे. या वेळी एफएसयूच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विद्यापीठाच्या आगामी उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले.

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा ; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरातांची मागणी

“हा केवळ लोगोच्या अनावरणाचा कार्यक्रम नाही, तर लाखो युवकांना कौशल्य, आत्मविश्वास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे भविष्य घडवण्याच्या संकल्पाची सुरुवात आहे,” अशी भावना एफएसयूचे संस्थापक कुलगुरू आणि फ्युएलचे अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी व्यक्त केली.

Exit mobile version