लष्करप्रमुखांची दक्षिण कमांडला भेट; माजी सैनिकांचा ‘योद्धा सेवा सन्मान’ने गौरव

Dhiraj Seth Southern Command लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी पुण्यातील दक्षिण कमांडला भेट देत माजी सैनिकांचा ‘योद्धा सेवा सन्मान’ने गौरव केला.

Dhiraj Seth Southern Command

Dhiraj Seth Southern Command

General Dhiraj Seth Southern Command Pune: भारतीय लष्कराचे प्रमुख (COAS) जनरल धीरज सेठ (Dhiraj Seth) यांनी पुण्यातील दक्षिण कमांडच्या (Southern Command)  मुख्यालयाला भेट देत लष्कराच्या कार्यात्मक सज्जतेचा आणि क्षमता वाढवण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी त्यांना विविध बाबींची माहिती दिली.

अण्णा हजारेंच्या प्रकृतीबाबत विखे पाटलांना चिंता; रुग्णालयात जाऊन घेतली भेट

या बैठकीत सध्याची सुरक्षा परिस्थिती, लष्कराची ऑपरेशनल तयारी, प्रशिक्षण उपक्रम आणि युद्धक्षमता वाढवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत जनरल सेठ यांना माहिती देण्यात आली. बदलत्या युद्धपद्धतीच्या पार्श्वभूमीवर लष्कराने सातत्याने सज्ज राहण्यासोबतच परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता विकसित करावी, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

तंत्रज्ञान आणि स्वदेशी क्षमतेवर भर

कमांडर आणि जवानांशी संवाद साधताना लष्करप्रमुखांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, प्रशिक्षणातील सातत्य आणि युद्धकौशल्य अधिक सक्षम करण्यावर भर दिला. वास्तव परिस्थितीशी साधर्म्य असलेलं प्रशिक्षण, लष्कराच्या विविध घटकांमधील समन्वय आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास या बाबी भविष्यातील लष्करासाठी महत्त्वाच्या असल्याचं त्यांनी नमूद केलं.

मोठी बातमी : मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली; उपचारही नाकारले

भारतीय लष्कराने अधिक चपळ, तंत्रज्ञानसक्षम आणि भविष्यातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सज्ज असावं, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचं आवाहन जनरल धीरज सेठ यांनी केलं. दक्षिण कमांडमधील अधिकारी आणि जवानांच्या समर्पणाचं त्यांनी कौतुक केलं.

माजी सैनिकांचा ‘योद्धा सेवा सन्मान’ने गौरव

या दौऱ्यात जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते काही उल्लेखनीय माजी सैनिकांचा ‘योद्धा सेवा सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला. माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केलेलं काम, युवकांना सक्षम करण्यासाठीचे उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेतील योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला.

“सोनं खरेदी करु नका”; GDP वाढीनंतर मोदींचा देशवासीयांना सल्ला

माजी सैनिकांची देशसेवेची भावना आणि राष्ट्रउभारणीत त्यांचं योगदान याचं लष्करप्रमुखांनी कौतुक केलं. भारतीय लष्कर आणि माजी सैनिकांमधील नातं हे सेवाकाळ संपल्यानंतरही आयुष्यभर कायम राहतं, असंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं.

Exit mobile version