चंद्रशेखर बावनकुळेंनीच कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केले; मनोज जरांगेंचा थेट आरोप

Jarange alleges; Bawankule issued instructions to cancel the Kunbi caste certificate "मराठा समाजाच्या नोंदी बोगस असल्याचा दावा करून त्यांनीच जातप्रमाणपत्रे रद्द करण्यास भाग पाडले

Manoj Jarange: चंद्रशेखर बावणकुळे यांनीच कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करायला सांगितले.

Manoj Jarange: चंद्रशेखर बावणकुळे यांनीच कुणबी जातप्रमाणपत्र रद्द करायला सांगितले

Manoj Jarange alleges; Bawankule issued instructions to cancel the Kunbi caste certificate : मराठवाड्यातील काही कुणबी जातप्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जबाबदार धरले आहे.

एकनाथ शिंदे किती दिवस डबल ढोलकी वाजवणार? 25-30 आमदार पाडणार; मनोज जरांगे भडकले

या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मनोज जरांगे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी जरांगे यांनी संपूर्ण परिस्थिती उदय सामंत यांच्यासमोर मांडली. संवादादरम्यान उदय सामंत यांनी, “कुणबी जातप्रमाणपत्रे नेमकी कोणत्या कारणामुळे रद्द होत आहेत, याची मी सखोल चौकशी करतो,” असे आश्वासन दिले.

धनुष्यबाण कोणाचा? आज होणार फैसला LIVE

यावेळी मनोज जरांगे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर गंभीर आरोप करत, “मराठा समाजाच्या नोंदी बोगस असल्याचा दावा करून त्यांनीच जातप्रमाणपत्रे रद्द करण्यास भाग पाडले,” असा आरोप केला.

तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी; गोवा खंडपीठाने निर्दोष मुक्तता रद्द केली

तसेच, “मराठा समाजाच्या विरोधात काम करणारे काही ओबीसी नेते तसेच शिंदे गटातील नेते आणि प्रवक्ते छत्रपती संभाजीनगर येथील शिंदे सेनेच्या कार्यालयात माझ्याविरोधात कटकारस्थान रचत आहेत. हे सर्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीनेच सुरू आहे,” असाही आरोप जरांगे यांनी केला.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना नक्कीच फूटली, पण…

यावर उदय सामंत यांनी जरांगे यांची समजूत काढत, “शिंदे साहेब असे कधीच करू शकत नाहीत. रद्द करण्यात आलेल्या जातप्रमाणपत्रांची माहिती मला पाठवा. मी स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करतो,” असे आश्वासन उदय सामंत यांनी जरांगे पाटलांना दिले.

Exit mobile version