Tukaram Mundhe MPSC Exam Irregularities Inquiry: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा चौकशी आयोग नेमण्यात आला असून, तुकाराम मुंढे हे या आयोगाचे सदस्य सचिव आहेत. या प्रकरणाशी संबंधित विद्यार्थ्यांना आपली तक्रार किंवा माहिती 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत आयोगाकडे सादर करता येणार आहे. अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.
मोठी बातमी : बारामती विमानतळासाठी 65 कोटींचा निधी मंजूर; अजित पवारांच्या अपघातानंतर निर्णय
MPSC च्या एकूण 9 परीक्षांचा समावेश
या चौकशी आयोगाच्या कार्यक्षेत्रात MPSC च्या एकूण 9 परीक्षांचा समावेश आहे. यामध्ये औषध निरीक्षक परीक्षा गट-ब 2025, महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025, महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025, महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024, अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा 2023, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025 आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025 या परीक्षांचा समावेश आहे.
उजनीतील एआय डेटा सेंटर विकास की विनाश? 9 टीएमसी पाण्याच्या वापरावरून रोहित पवारांचा सरकारला सवाल
या परीक्षांबाबत तक्रार किंवा संबंधित माहिती असलेले परीक्षार्थी, विद्यार्थी, नोंदणीकृत संस्था तसेच इतर व्यक्तींना आपले निवेदन आयोगाकडे प्रत्यक्ष सादर करता येणार आहे. तक्रार किंवा माहिती मराठी अथवा इंग्रजी भाषेत शपथपत्राच्या स्वरूपात द्यावी लागेल. त्यासोबत वैध ओळखपत्र आणि संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडणे आवश्यक आहे.
कुठे आणि कशी तक्रार कराल?
तक्रारदारांनी आपले निवेदन complaints.inquirycom.mpsc@maharashtra.gov.in या ई-मेलवरही पाठवावे. तसेच आयोगाचे कार्यालय अन्न व औषध प्रशासन भवन, दुसरा मजला, दालन क्रमांक 201, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई येथे आहे. अधिक माहितीसाठी 20867677 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
MPSC परीक्षांशी संबंधित गैरव्यवहार किंवा अनियमिततेबाबत माहिती असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि संबंधित व्यक्तींनी दिलेल्या मुदतीत पुराव्यांसह आपले निवेदन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
