सोलापुरात डीजेबंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Solapur Bans DJ बंदी घालण्याचे आदेश सोलापुर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत. 13 ते 26 सप्टेंबरपर्यंत सोलापुरात ही बंदी असणार आहे.

Solapur Bans DJ

Solapur Bans DJ

Solapur Bans DJ and Laser Lights During Ganeshotsav: गणेशोत्सवामध्ये डीजेच्या आवाजामुळे ध्वनीप्रदुषणाचा विषय चर्चेत आला आहे. पुण्यात डीजेवर बंदी (DJ Ban) घालण्याची मागणी जोर धरत आहे. डीजेवर बंदी घालण्याच्या मागणीवर विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) हे आग्रही आहेत. अशातच सोलापुरात (Solapur) गणेशोत्सवानिमित्त डीजे आणि लेझर लाईटला बंदी घालण्यात आली आहे. बंदी घालण्याचे आदेश सोलापुर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत. 13 ते 26 सप्टेंबरपर्यंत सोलापुरात ही बंदी असणार आहे. या बंदीचे उल्लंघन केल्यानंतर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

रुग्णालयाच्या PICU मध्ये मध्यरात्री आग; 9 नवजात शिशू सुखरूप, मोठी दुर्घटना टळली

डीजेच्या कर्कश आवाजाने वृद्धांना, बालकांना त्रास होतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, नागपुर, धुळे या ठिकाणीही डीजे लावण्यास परवाणगी दिली नाही.

नेपाळमध्ये अडकलेले 54 भारतीय मुंबईत सुखरूप परतले; माजी खासदार राहुल शेवाळेंकडून स्वागत

दरम्यान, पुण्यात तर डीजेचा मुद्दा खुप चर्चेत आहे. कारण म्हणजे विद्यानंद बापट यांचा डीजेला असलेला विरोध. त्यांच्या विरोधामुळे पुण्यासह डीजेचा मुद्दा राज्यभर पसरला आहे. त्यांच्या या विरोधामुळे त्यांना गणेशमंडळांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. काल (3 सप्टेंबर) त्यांच्यावर पुण्यात एका तरुणाकडून हल्लाही करण्यात आला. त्या हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव संतोष चव्हाण असून त्याच्याविरोधात बापटांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. आज त्या तरुणाला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

नवीन प्रभाग केवळ कागदावर नको, मनुष्यबळ अन् यंत्रणा द्या; राहुल कलाटेंची महापालिका प्रशासनाकडे मागणी

तर एकूणच या घटनेमुळे ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ हा मुद्दा राज्यभर चर्चेत आहे.

Exit mobile version