जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या अन्यथा… भाजपमधील जोरदार इन्कमिंगवरून गडकरींचा इशारा

Nitin Gadakari यांनी त्यांच्या स्पष्ट वक्तेपणा दाखवून देत नागपुरी भाषेत भाजपच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. तसेच नेत्यांचे कानही टोचले.

Nitin Gadakari

Nitin Gadakari

Union Minister Nitin Gadakari criticize BJP for Incoming and Ignorance towards old activist : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. वेळ आली तर ते त्यांचाच पक्ष असलेल्या भाजपला किंवा त्यातील नेत्यांना सुनावल्याशिवाय किंवा कान टोचल्याशिवाय राहत नाहीत. यावेळी देखील त्यांनी अशाच प्रकारे भाजपमधल्या जोरदार इन्कमिंगवरून पक्षाला इशारा दिला आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी?

नागपूरमधील कळमेश्वर या ठिकाणी भाजपचे नेते राजू पोद्दार यांच्या कामांच्या आठवणींना उजाळा देण्याच्या कार्यक्रमांमध्ये नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणामध्ये नितीन गडकरी म्हणाले की, जो चांगला माणूस असतो तो घर की मुर्गी दाल बराबर असतो. त्यामुळे बाहेरचा सावजी चिकन मसाला चांगला लागतो. जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा. आता मी तर नाही, तुम्ही नेतृत्व करता, कारण हे जोपासलेले कार्यकर्ते आहेत. त्यांची जर तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालले आहात तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही. अशाप्रकारे बोलत नितीन गडकरी यांनी त्यांच्या स्पष्ट वक्तेपणा दाखवून देत नागपुरी भाषेत भाजपच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. तसेच नेत्यांचे कानही टोचले.

मंगळ ते शनी कोणत्या ग्रहांचा परिणाम होणार? जाणून घ्या बाराही राशींचे राशीभविष्य

दरम्यान सध्या राज्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांना भाजपमध्ये सहभागी करून घेतले जात आहे. त्यामुळे पक्षांमध्ये सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे. मात्र यामुळे संधी देताना पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांकडे डावललं जातं यातून पक्षाचं मोठं नुकसान देखील होऊ शकतं.

Exit mobile version