Download App

एर्टिगा आणि इनोव्हाला विसरा… येत आहे ‘ह्या’ 3 स्वस्त 7-सीटर कार्स, किंमत फक्त 6 लाख रुपये

Cheap 7-Seater Car : भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून 7 सीटर कार्सची मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे एर्टिगा, इनोव्हा सारख्या

  • Written By: Last Updated:

Cheap 7-Seater Car : भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून 7 सीटर कार्सची मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे एर्टिगा, इनोव्हा सारख्या कार्सची विक्री देखील झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे आता भारतीय बाजारात नवीन वर्षात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 3 नवीन 7 सीटर कार्स लॉंच होणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील स्वस्तात नवीन 7 सीटर कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षात भारतीय बाजारात मारुती सुझुकी टोयोटा व्हर्जनमध्ये 7 सीटर कार लाँच करणार आहे. याचबरोबर निसान कॉम्पॅक्ट एमव्हीपी कार लाँच करणार आहे आणि किया देखील केरेन्स इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. ह्या कार्स बाजारात Mahindra Scorpio, Mahindra Bolero, Kia Carens, Maruti Eeco, Toyota Innova Crysta, Mahindra XUV700 सारख्या कार्सना टक्कर देणार आहे.

निसान कॉम्पॅक्ट एमपीव्ही

निसान इंडिया नवीन वर्षात भारतीय बाजारात एक नवीन स्वस्त 7 सीटर कार लाँच करणार आहे. ही कार Renault Triber वर आधारित असेल. माहितीनुसार, या कारमध्ये इंटरियर लेआउट आणि इंजिन सेटअप मॅग्नाइटमधून घेण्यात येणार आहे. तर काही डिझाइन वेगळी असणार आहे. या 7 सीटर कारची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. तसेच या कारमध्ये जबरदस्त फीचर्स आणि शक्तीशाली इंजिन देण्यात येणार आहे.

केरेन्स इलेक्ट्रिक

भारतीया बाजारात इलेक्ट्रिक कार्सचा क्रेझ पाहता लोकप्रिय केरेन्स कार देखील इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉच करणार आहे. माहितीनुसार, केरेन्स इलेक्ट्रिक कार 2025 च्या उत्तरार्धात लाँच होऊ शकते. भारतीय बाजारात या कारची किंमत देखील कमी असणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या कारमध्ये जबरदस्त फीचर्स आणि बेस्ट रेंज देखील मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भेदभाव करू नका, लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या; उद्धव ठाकरेंनी सुनावलं

मारुती कॉम्पॅक्ट एमपीव्ही

तर दुसरीकडे देशाची सर्वात मोठी ऑटोकंपनी मारुती सुझुकी देखील नवीन वर्षात जपान-स्पेस स्पेशियावर आधारित नवीन मिनी एमपीव्ही कार लाँच करणार असल्याची चर्चा बाजारात सुरु आहे. ही नवीन कार सब-4 मीटर एमपीव्ही असेल तसेच नवीन Z-सीरीज पेट्रोल इंजिन या कारमध्ये देण्यात येणार आहे. या कारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन फीचर्स देण्यात येणार आहे असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

follow us

संबंधित बातम्या