2024 Hyundai Alcazar पॅनोरॅमिक सनरूफ अन् क्रूझ कंट्रोलसह लाँच, किंमत 14.99 लाख रुपये

  • Written By: Published:
2024 Hyundai Alcazar पॅनोरॅमिक सनरूफ अन् क्रूझ कंट्रोलसह लाँच, किंमत 14.99 लाख रुपये

2024 Hyundai Alcazar : भारतीय बाजारात आज Hyundai ने मोठा धमाका करत आपली नवीन कार 2024 Hyundai Alcazar लाँच केली आहे. कंपनीने ही कार दोन इंजिन पर्यायांमध्ये लाँच केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कारमध्ये कंपनीने 70 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स दिले आहे. याच बरोबर या कारच्या डोर फोन किंवा स्मार्टवॉचच्या माध्यमातून देखील लॉक अनलॉक करण्याचा फीचर्स कंपनीने दिला आहे. तसेच बाजारात ही कार प्रेस्टिज, प्लॅटिनम आणि सिग्नेचर या चार व्हेरियंटमध्ये बाजारात लाँच करण्यात आली आहे.

2024 Hyundai Alcazar: डिझाइन

2024 Hyundai Alcazar च्या फ्रंटला कंपनीच्या लोगोसह कनेक्टेड LED DRL सेटअप देण्यात आला आहे तर खालच्या बाजूला एक मोठी ग्रिल देण्यात आली ज्याच्या दोन्ही बाजूला बॉक्सी एलईडी हेडलाइट्स आहेत. तर या कारच्या बंपरवर सिल्व्हर स्किड प्लेट देण्यात आली आहे. यात 18 इंची अलॉय व्हील्स आहेत.

2024 Hyundai Alcazar: इंटिरियर डिझाइन

तर या कारच्या इंटिरियरमध्ये टच-आधारित कंट्रोल पॅनेलसह ड्युअल झोन ऑटोमॅटिक क्लाइमेट कॉन्ट्रोल आहे. यामध्ये इन-बिल्ट नेव्हिगेशनसह इन्फोटेनमेंट सिस्टीम आणण्यात आली आहे. यात स्लीक एसी व्हेंट आणि क्रोम इन्सर्टसह ग्लॉस ब्लॅक स्ट्रिप आहे. केबिनच्या सर्व कोपऱ्यांवर सॉफ्ट टच मटेरियलसह लेदरेट अपहोल्स्ट्री प्रदान केली आहे. यासोबतच सेंटर कन्सोल, डोर आणि स्टीयरिंग व्हीलवर ग्लॉस ब्लॅक आणि क्रोम एलिमेंट्स देण्यात आले आहेत. नवीन अल्काझार 6- आणि 7-सीटर अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

2024 Hyundai Alcazar फीचर्स

2024 Hyundai Alcazar मध्ये कंपनीने ड्युअल-स्क्रीन सेटअप दिले आहे ज्यामध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.25-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देण्यात आले आहे. याच बरोबर यामध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, वायरलेस फोन चार्जर, पॅनोरॅमिक सनरूफ आणि क्रूझ कंट्रोल सारखी फीचर्स देण्यात आली आहे. फ्रंट सीटसाठी 8-वे पॉवर ऍडजस्टमेंट देखील प्रदान करण्यात आले आहे. Alcazar मध्ये इलेक्ट्रिक बॉस मोड देण्यात आला आहे.

2024 Hyundai Alcazar: सेफ्टी फीचर्स

2024 Hyundai Alcazar मध्ये सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), हिल स्टार्ट असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, ऑल-व्हील डिस्क ब्रेक यांसारखी फीचर्स आहेत. ऑटो होल्डमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरसह 360-डिग्री कॅमेरा देखील देण्यात आला आहे. तसेच लेन कीप असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग यांसारख्या लेव्हल-2 ADAS सारखी फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहे.

2024 Hyundai Alcazar: इंजिन

2024 Hyundai Alcazar मध्ये 1.5 लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. 1.5 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन 160 पीएस पॉवर आणि 253 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 6MT किंवा 7DCT गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. तर 1.5 लिटर डिझेल इंजिन 116 पीएस पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6MT किंवा 6AT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

रिंकू सिंगला संघात दाखल होण्यासाठी BCCI चं बोलावणं, सर्फराज, ऋषभ पंतपैकी एकाची जागा घेणार

2024 Hyundai Alcazar: किंमत

2024 Hyundai Alcazar च्या 1.5 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये तर 2024 Hyundai Alcazar च्या 1.5 लीटर डिझेल इंजिन व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 15.99 लाख रुपये आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या