भारताची तिरकी चाल, पाकिस्तानला धडकी भरणार; ‘मिग 21’ विमानांच्या जागी ‘LCA मार्क’

भारताची तिरकी चाल, पाकिस्तानला धडकी भरणार; ‘मिग 21’ विमानांच्या जागी ‘LCA मार्क’

नवी दिल्ली : देशाच्या संरक्षणासाठी सरकारकडून मोठा खर्च केला जात आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानाने समृद्ध शस्त्रांत्रांचा समावेश केला जात आहे. यातच आता भारताने संरक्षण प्रणाली आणखी मजबूत करण्याच्या इराद्याने पावले टाकली आहेत. मिग 21 विमानांचा वापर 2025 पर्यंत पूर्णतः बंद होणार आहे. त्याच्या जागी एलसीए फायटर प्लेन आणण्याची तयारी केली जात आहे. LCA मार्क 1 A तेजस एयरक्राफ्टचे अत्याधुनिक वर्जन आहे. यामध्ये अपग्रेडेड एवियॉनिक्स आणि रडार प्रणाली बसविण्यात आली आहे. भारतीय वायू सेनेकडून या विमानांची तैनाती वेस्टर्न सेक्टरमध्ये करण्यात येणार आहे. पाकिस्तानसाठी या विमानांची गर्जना धोक्याची घंटा ठरणार आहे. पश्चिम भागातील दोन विमानतळे जेथून मिग विमाने उड्डाणे घेत होती तेथे आता एलसीए एमके 1 आणि एमके 1 ए या विमानांसाठी तयारी केली जात आहे.

Pakistan : पाकिस्तानात दहशतवाद्यांचा गोळीबार! सैन्यातील अधिकाऱ्यासह चार जण ठार

LCA मार्क 1A हे तेजस विमानाचे अपग्रेडेड वर्जन आहे. या विमानात अनेक अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. रडार वॉर्निंग रिसीवर, संरक्षणासाठी जॅमर पॉड सहित आणखीही काही खास वैशिष्ट्ये आहेत. हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर मारा करण्यात हे विमान अत्यंत कार्यक्षम आहे. या विमानाचे वजनही कमी आहे. हिंदु्स्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने ही विमाने तयार केली आहेत. हे विमान सर्वात हलके आणि सर्वात लहान बहुउद्देशीय सुपरसोनिक लडाकू विमान आहे.

मिग 21 लवकरच इतिहासजमा होणार 

भारताने आधी 83 एलसीए मार्क 1ए विमानांची ऑर्डर दिली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये ही विमाने भारतात येतील. या विमानातील 65 टक्क्यांपेक्षा जास्त उपकरणे भारतातच तयार करण्यात आली आहेत. 1963 नंतर भारतीय हवाई दलाला विविध प्रकारांतील जवळपास 872 मिग फायटर प्लेन मिळालेले आहेत. यातील काही विमान क्रॅश झाली आहेत. मिग 21 ही विमाने सर्वाधिक क्रॅश झाली आहेत. त्यामुळे मिग 21 विमाने पूर्णपणे हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

MIG-21 Crash Video : राजस्थानमध्ये लष्कराचे मिग-21 कोसळले; दोघांचा मृत्यू

हिंदुस्तान एरोनॉटिक्सने मागील महिन्यात भारतीय वायूसेनेला पहिल्या हलक्या लढाऊ विमान तेजसची ट्विन सीटर आवृत्ती सुपू्र्द केली. यानंतर लढाऊ विमाने स्वतः तयार करून ते तैनात करण्याची क्षमता असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. हवाई दलाने कंपनीला 18 ट्विन सीटर विमानांची ऑर्डर दिली आहे. यापैकी 8 विमानांची पहिली खेप 2023-24 च्या दरम्यान मिळेल. राहिलेल्या दहा विमानांचा पुरवठा 2026-27 पर्यंत केला जाईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube