MIG-21 Crash Video : राजस्थानमध्ये लष्कराचे मिग-21 कोसळले; दोघांचा मृत्यू
Army MIG-21 Crash : राजस्थानमधील हनुमानगढजवळ लष्कराच्या मिग- 21 या लढाऊ विमानाला अपघात झाला आहे. हे विमान एका घरावर कोसळून हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या विमानाने सुरतगड येथून विमानाने उड्डाण केले होते. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत.
#WATCH | Indian Air Force MiG-21 fighter aircraft crashed near Hanumangarh in Rajasthan. The aircraft had taken off from Suratgarh. The pilot is safe. More details awaited: IAF Sources pic.twitter.com/0WOwoU5ASi
— ANI (@ANI) May 8, 2023
याबाबत अधिक माहिती अशी की, लष्कराच्या मिग-21 या लढाऊ विमानाने आज सकाळी सुरतगड येथून उड्डाण केले होते. त्यानंतर हनुमानगडजवळ अचानक हे विमान एका घरावर कोसळले. यात दोघाजणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
#UPDATE | Rajasthan: Two civilian women died and a man was injured after the plane crashed on their house in Bahlolnagar in Hanumangarh district. Rescue operation underway: Police
— ANI (@ANI) May 8, 2023
दरम्यान, वैमानिक आणि सहवैमानिकाने वेळीच घटनेचे गांभीर्य लक्षात घेत विमानातून पॅरेशूटच्या मदतीने विमानातून उडी मारली. त्यामुळे या दोघांचाही जीव वाचू शकला. मात्र, हे विमान एका घरावर कोसळल्याने एका महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. परंतु, हवाई दलाकडून अद्याप या मृत्युंची पुष्टी करण्यात आलेली नाही. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतेही ठोस कारण अथवा माहिती समोर आलेली नाही.
https://letsupp.com/maharashtra/lady-expose-on-ganesh-naik-complaint-43613.html
अपघातांची मालिका सुरूच
जानेवारीच्या सुरुवातीला, राजस्थानच्या भरतपूरमध्ये प्रशिक्षणादरम्यान सुखोई एसयू-30 आणि मिराज 2000 ही दोन भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने कोसळली होती. या अपघातात पायलटला जीव गमवावा लागला होता. एक विमान मध्य प्रदेशातील मुरैना येथे कोसळले होते, तर दुसरे विमान राजस्थानमधील भरतपूर येथे कोसळले होते. याशिवाय गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते.
Video : माजी पंतप्रधान देवेगौडांशी नाथाभाऊंचं सख्य जुळलं कसं?