Pakistan : पाकिस्तानात दहशतवाद्यांचा गोळीबार! सैन्यातील अधिकाऱ्यासह चार जण ठार

Pakistan : पाकिस्तानात दहशतवाद्यांचा गोळीबार! सैन्यातील अधिकाऱ्यासह चार जण ठार

Pakistan : पाकिस्तानातील मियांवली हवाई तळावरील (Pakistan) दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका हल्ल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानात दहशतवादी हल्ले सातत्याने होत आहेत. आताची घटना खैबर पख्तुनख्वा प्रांतातील खैबर जिल्ह्यातील तिराह भागात घडली. दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्यात उडालेल्या धुमश्चक्रीत सैन्यातील एक अधिकारी आणि तीन जवान मारले गेले. पाकिस्तानी सेनेच्या मीडिया शाखा इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनने निवेदनात म्हटले आहे, की या घटनेत एक अधिकारी आणि तीन सैनिक ठार झाले. तर तीन दहशतवादी सुद्धा मारले गेले आणि तीन दहशतवादी गंभीर जखमी झाले आहेत. या मोहिमेत पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना घेरले होते त्यानंतर गोळीबार करावा लागला.

Pakistan : पाकिस्तानात मोठा हल्ला! हवाई तळात दहशतवाद्यांची घुसखोरी, गोळीबार सुरू

याआधी 4 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियांवली येथील हवाई तळावर हल्लेखोरांसह दहशतवादी घुसून गोळीबार केला होता. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत जोरदार गोळीबार झाला. या हल्ल्याने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली. सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट देण्यात आला. या घटनेनंतर व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले होते. या व्हिडिओत जोरदार गोळीबाराचा आवाज ऐकू येत होता. यानंतर पुन्हा एकदा असाच हल्ला झाला आहे. पाकिस्तानात सातत्याने दहशतवादाच्या घटना घडत आहेत. दुसऱ्या देशात दहशतवादी पाठवून हल्ले करणारा पाकिस्तान आता स्वतःच दहशतवाद्यांच्या हल्ल्यांनी त्रस्त झाला आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube