Download App

मागेल त्याला विहीर अनुदान योजनेचा लाभ कोणाला अन् किती मिळणार?

Government Schemes : मनरेगा अंतर्गत राज्य सरकार (State Govt राज्यात विहीर अनुदान योजना (Well Subsidy Scheme)राबवित आहे. विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करुन राज्यातील सर्व शेतकरी (farmer)या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत पात्र शेतकर्‍यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये आर्थिक मदत सरकारकडून केली जाणार जाते.

Pune Drug Case मध्ये महत्त्वाची अपडेट; कुरकुंभ दिल्ली व्हाया लंडनला असं पोहचलं 140 किलो एमडी ड्रग्ज

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) सिंचन विहिरींची कामे केली जाणार आहेत. मनरेगा अधिनियमाच्या परिशिष्ट 1 कलम 1(4) मधील तरतुदीनुसार खाली दिलेल्या प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामं राज्य सरकारकडून केली जाणार आहेत.
दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
अनुसूचीत आणि भटक्या जमाती
स्त्री प्रमुख असलेली कुटुंबे
विमुक्त जाती आणि जमाती
इंदिरा गांधी आवास योजनेखालील लाभार्थी
विकलांग शेतकरी कुटुंब
सर्व सीमान्त शेतकरी (2.5 एकरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले कुटुंब)
अल्प भूधारक शेतकरी ( 5 एकरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले)

मराठा आंदोलन वॉशिंग मशीनमध्ये शिरना म्हणून चौकशी सुरू; अंबादास दानवेंचे टीकास्त्र

योजनेसाठी आवश्यक पात्रता
– विहीर अनुदान योजनेचा लाभ घेणारा शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
– योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍याकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
– आधीच अस्तित्वात असलेल्या पेयजल स्त्रोतच्या 500 मीटर च्या परिसरात विहीर घेण्यास प्रतिबंध घातलेले आहे.
– लाभ घेणार्‍या शेतकर्‍याकडे एकूण क्षेत्रफळाचा सातबारा असावा.
– लाभ घेणारा शेतकरी जॉब कार्डधारक असावा.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्र :
– अर्जदाराचे ड्रायव्हिंग लायसन्स / पॅन कार्ड
– शेतजमिनीची कागदपत्रे
– आधार कार्ड
– मोबाईल क्रमांक
– पासपोर्ट फोटो
– बँक खाते पासबुक

मागेल त्याला विहीर या योजनेंतर्गत अर्ज करु इच्छिणाऱ्या अर्जदाराला online अर्ज सादर करावा लागणार आहे.
http://aaplesarkar.maharashtra.gov.in या website वर उपलब्ध करुन दिले आहेत.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us