BOB Bharti 2024: बॅंकेत नोकरी (Bank Job) करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या भरती अंतर्गत अग्निशमन अधिकारी (fire officer) , व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक ही पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://www.bankofbaroda.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे अर्ज करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी आवश्यक रिक्त जागा, अर्जाची तारीख, अर्ज शुल्क याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊ.
Shriya Saran : साउथ इंडियन ब्युटी श्रिया सरनच्या लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष
पदाचे नाव आणि पदसंख्या :
अग्निशमन अधिकारी – 02 पदे.
व्यवस्थापक (मॅनेजर) – 10 पदे.
वरिष्ठ व्यवस्थापक (सीनियर मॅनेजर) – 09 पदे.
मुख्य व्यवस्थापक (चीफ मॅनेजर) – 01 पद.
एकूण पदांची संख्या – 22 जागा.
मोठी बातमी! मोदी सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली; 3 लाख मेट्रीक टन निर्यातीला मंजुरी
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचा बायोडेटा, दहावी, बारावी व शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना) आणि पासपोर्ट या कागदपत्रांसह अर्ज सादर करावा
शैक्षणिक पात्रता-
पदानुसार शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली दिली आहे.
लिंक – https://drive.google.com/file/d/1Vnvh-n2_XsszjkR6lEFH6JEXGvW6VB1-/view
अर्जाची तारीख
या पदभरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली आहे. तसेच, अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2024 असेल.
अर्ज शुल्क:
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांसाठी रु. 600; तर SC, ST आणि महिला उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल.
अर्ज करताना काय लक्षात ठेवावे?
भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. उमेदवाराने अर्जामध्ये अपूर्ण माहिती दिल्यास, अर्ज नाकारला जाईल. नमूद तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.