मोठी बातमी! मोदी सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली; 3 लाख मेट्रीक टन निर्यातीला मंजुरी
Modi Government lifts Onion Export Ban : केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारने देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या दरात सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारने कांद्याची परदेशात निर्यात बंद केली होती. या निर्णयामुळे देशात कांद्याचे भाव पडले होते आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीही वाढल्या होत्या. सरकारने तातडीने कांदा निर्यातबंदी उठवून दिलासा द्यावा अशी मागणी केली जात होती. या मागणीचा विचार करून अखेर आज सरकारने कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेतील मंत्र्यांच्या समितीन कांदा निर्यातीला मान्यता दिली.
देशातील कांद्याच्या किंमतीत वाढ होत चालल्याने निर्यात बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. 31 मार्च 2024 पर्यंत मुदत ठेवली होती. परंतु ही मुदत संपण्याआधीच सरकारने निर्यातबंदी मागे घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येणार असून त्यांना जास्तीचे पैसे मिळतील. गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याचा साठा पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी गृहमंत्री अमित शहा यांना देशातील कांद्याच्या परिस्थितीची माहिती दिली. यानंतर समितीच्या बैठकीत चर्चा होऊन हा निर्णय घेण्यात आला.
कांदा निर्यात बंदी जानेवारीमध्येच मागे अथवा.. खासदार विखे यांचे मोठे विधान
केंद्र सरकार लवकरच कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा होती. कांदा उत्पादक क्षेत्रांत कांद्यासह अन्य भाजीपाल्याच्या भावात घसरण झाल्यामुळे सरकार हा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात होते. आता समितीने हा निर्णय घेत जवळपास 3 लाख मेट्रीक टन कांदा निर्यातीला मंजुरी दिली आहे. याबरोबरच बांग्लादेशात 50 हजार मेट्रीक टन कांदा निर्यातीला मंजुरी देण्यात आली आहे.
कांदा उत्पादनातील टंचाई आणि वाढलेल्या किंमती पाहता केंद्र सरकारने 8 डिसेंबर रोजी कांद्याची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची मुदत 31 मार्च 2024 पर्यंत राहिल असे सरकारने स्पष्ट केले होते. यानंतर डिसेंबर महिन्यात कांद्याचे भाव प्रचंड वाढल्याचे दिसून आले होते. सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात कांद्याच्या किंमती घटल्या होत्या. त्यामुळे देशाच्या अन्य भागात कांदा पुरवठा करणे शक्य झाले.
कांद्याच्या प्रश्नासाठी खासदार विखे गृहमंत्र्यांच्या दारी, अमित शाह म्हणाले…