Download App

BMC मध्ये नोकरीची संधी, महिन्याला 81 हजार रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

  • Written By: Last Updated:

BMC HR Recruitment 2024: नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मानव संसाधन समन्वयक (Human Resource Coordinator) पदांच्या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. एकूण 38 जागांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची ताऱीख? अर्जाचे शुल्क? याच विषयी जाणून घेऊ.

AAP Candidate List : मंत्रीच निवडणुकीच्या रिंगणात; ‘पंजाब’साठी आपकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर 

एकूण पदांची संख्या
बीएमसीच्या या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची शैक्षणिक पात्रतेच्या आधारे निवड केली जाईल. नोकरीचे ठिकाण मुंबईत आहे.

वय श्रेणी
या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे इतकं असावं. तर कमाल वय ३८ वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

हरिशचंद्र चव्हाणांची घरवापसी? दिंडोरीत भारती पवारांच्या विरोधात पवारांना आठवला जुना कार्यकर्ता…

अर्जाची तारीख आणि अर्ज फी
या पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन पध्दतीने अर्ज करावा लागेल. 24 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2024 आहे. या पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी दिलेल्या मुदतीतच अर्ज करावा. कारण, उशीरा आलेले अर्ज नाकारले जातील, याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतरच अर्ज करावा. कारण, अर्ज करताना अर्जात काही त्रुटी राहिल्यास अर्ज फेटाळल्या जाईल.
साधारण प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 900 रुपये भरावे लागतील.

शैक्षणिक पात्रता
मानव संसाधन समन्वयक पदासाठी अर्ज करण्यासाठी, पात्र उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेली असावी. उमेदवाराने प्रथम प्रयत्नामध्ये 45 टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात ४५% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पगार
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 रुपये ते 81,100 रुपये पगार मिळू शकतो.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 24 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2024

अधिकृत वेबसाइट – https://www.mcgm.gov.in/

PDF जाहिरात https://shorturl.at/kCHK7

ऑनलाइन अर्ज – https://shorturl.at/bvCK7

अधिकृत वेबसाइट – https://www.mcgm.gov.in/

follow us