CIBIL Score : सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर लोन आणि क्रेडिट कार्डशी (CIBIL Score) संबंधित आहे. क्रेडिट स्कोअर तुम्ही युपीआय अॅप किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतींनी तपासू शकता. सिबिल स्कोअर वारंवार चेक केल्याने कमी होतो असे सांगितले जाते. पण यात काही तथ्य नाही. सिबिल स्कोअर वर्षातून एक किंवा दोन वेळा चेक करणे अतिशय गरजेचे आहे. याचे काही फायदेही आहेत जे आर्थिक स्थितीशी संबंधित आहेत. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती घेऊ या..
तुम्ही युपीआय अॅप किंवा गुगल पे याद्वारे (Google Pay) तुमचा सिबिल स्कोअर काही मिनिटात चेक करू शकता. पहिल्यांदा स्कोअर चेक करत असाल तर काही महत्वाची माहिती भरावी लागते. यानंतर तुम्ही अगदी सहजपणे तुमचा सिबिल स्कोअर चेक करू शकता. सिबिल स्कोअर चेक केल्यानंतर तुम्ही तुमची सध्याची आर्थिक स्थिती माहीत करून घेऊ शकता.
कमीत कमी व्याजदरात कसे घ्याल पर्सनल लोन? सोपा फंडा माहिती करून घ्याच!
जर तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर तो वाढवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तत्काळ कार्यवाही करू शकता. यामुळे भविष्यात तुम्हाला काहीच अडचणी येऊ शकणार नाहीत. याबरोबरच तुम्ही सिबिल रिपोर्टमधील चुका (Credit Score) सुद्धा शोधून काढू शकता. जर काही चूक आढळून आली तर ती दुरुस्त करता येईल.
जर एखादा व्यक्ती तुमच्या नावावर क्रेडिट कार्ड बनवतो किंवा लोन उघडतो तर याचीही माहिती तुम्ही घेऊ शकता. माहिती मिळाल्यानंतर या माहितीची खात्री करून तुम्ही संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करू शकता.
जर तुम्ही सध्याच्या काळात कर्ज घेण्याचा (Loan) विचार करत असाल तर आधी क्रेडिट स्कोअर काय आहे (Credit Score) याची व्यवस्थित माहिती घ्या. एक चांगला क्रेडिट स्कोअर कर्जावरील व्याजदर कमी करण्यात मदत करू शकतो. तसेच एक चांगला क्रेडिट स्कोअर तुम्हाला कर्ज मिळवून देण्यातील अडचणी कमी करू शकतो.
क्रेडिट स्कोअर 720 किंवा त्यापेक्षा जास्त असणेच योग्य मानले जाते. कर्जाबरोबरच क्रेडिट कार्ड (Credit Card) मिळण्यातील अडचणी यामुळे कमी होतील.
पर्सनल लोनवर आणखी कर्ज घेणे किती योग्य? Top UP चे फायदे अन् तोटे जाणून घ्याच!