Download App

भटकंती करायला आवडतं पण, ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतलाय का? जाणून घ्या फायदे..

ट्रॅव्हल इन्शुरन्सचे अनेक फायदे मिळतात. त्यामुळे तुम्हाला फिरण्याची आवड असेल तर हा विमा खरेदी करणे फायद्याचे ठरेल.

Travel Insurance : जर तुम्हाला फिरायला जाणे आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी जास्त फायद्याची ठरू शकेल. कोरोना संकटनंतर देशात ट्रॅव्हल उद्योगाने (Travel Industry) मोठी भरारी घेतली आहे. लोक फक्त देशातच नाही तर विदेशात जाणेही पसंत करत आहे. तुम्ही लाइफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, होम इन्शुरन्सबाबतीत ऐकलेच असेल. पण काय तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स बाबतीत (Travel Insurance) कधी ऐकले आहे का? तुम्ही कधी हा विमा खरेदी केला आहे का? ट्रॅव्हल इन्शुरन्स खूप महत्वाचा आहे. हा विमा तुम्हाला अनेक जोखीम पासून वाचवतो. जर दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली तर तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स घेऊन अगदी आरामात फिरायला जाऊ शकता. या इन्शुरन्सचे अनेक प्रकारचे फायदे आहेत. त्यांची माहिती घेऊ या..

मेडिकलचा खर्च

जर तुम्ही प्रवासात असताना एखादी दुर्घटना घडली तर अशा वेळी ट्रॅव्हल इन्शुरन्स तुमची खूप मदत करू शकतो. यामध्ये तुम्हाला ॲक्सिडेंट, इवक्यूएशन, मेडिकल एक्स्पेन्सेससाठी (Medical Expenses) कव्हर मिळतो.

विमा पॉलिसीचं टेन्शन विसरा! कागदपत्र अन् क्लेम प्रोसेस सगळचं सोपं; जाणून घ्या E Insurance काय?

साहित्यासाठी संरक्षण

ट्रॅव्हल वेळी चेक इन केलेल्या सामानावर देखील इन्शुरन्स कव्हर (Insurance Cover) मिळतो. जर प्रवासात तुमची एखादी वस्तू हरवली तर तुम्ही यासाठी क्लेम करू शकता. बऱ्याचदा असे होते की तुम्हाला अचानक फिरण्याच्या प्लॅन मध्ये बदल करावा लागतो. खराब तब्बतीमुळे किंवा फ्लाईट कॅन्सल झाल्यावर किंवा हॉटेल मधील बुकिंग कॅन्सल झाल्यावर प्लॅन बदलावा लागू शकतो. अशा वेळी सुद्धा इन्शुरन्स कंपनी भरपाई देते.

पर्सनल लायबिलिटी

ट्रॅव्हल करताना विमाधारक व्यक्तीकडून थर्ड पार्टीला काही आर्थिक नुकसान झाले तर अशा परिस्थितीत (Personal Liability) ट्रॅव्हल इन्शुरन्स खूप मदत करू शकतो. अशा वेळी इन्शुरन्स कंपनी तुमच्याकडून झालेल्या नुकसानीची भरपाई करून देते.

Insurance Fraud : 11 कोटींसाठी विद्यार्थ्याचं भयानक पाऊल; तब्बल 10 तास ड्राय आईसमध्ये ठेवले पाय

follow us