Insurance Tips : तुम्ही एखाद्या कंपनीत जॉब करत असाल तर त्या कंपनीकडून तुम्हाला (Insurance Tips) पगार तर मिळतोच. पण या बरोबरच अन्य काही सुविधा देखील कंपनी देत असते. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना हेल्थ इन्शुरन्स उपलब्ध (Health Insurance) करून देतात. पण या पॉलिसीसाठी (Corporate Insurance) तुमच्या पगारातून एक ठराविक रक्कम कपात होत असतेच. कंपनीकडून जो कव्हर दिला जात आहे तो पुरेसा ठरतो का हा खरा प्रश्न आहे. जर असे नसेल तर वैयक्तिक इन्शुरन्स (Personal Insurance) घेणे कितपत योग्य ठरेल.
कंपन्यांकडून जो इन्शुरन्स कव्हर दिला जातो तो पुरेसा असतो असे अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणजेच तुमच्या उपचाराचा सर्व खर्च त्यातून कव्हर होईल असा अर्थ घेतला जातो. परंतु यात सत्यता नाही. कारण कंपन्यांकडून जो इन्शुरन्स कव्हर (Insurance Cover) दिला जातो त्यात अनेक मर्यादा असतात. त्यामुळे विमा क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की कर्मचाऱ्यांनी फक्त कंपनीने दिलेल्या हेल्थ इन्शुरन्सवरच अवलंबून राहू नये. स्वतंत्र इन्शुरन्स कव्हर घेतला पाहिजे. चला तर मग कंपनी इन्शुरन्स आणि पर्सनल इन्शुरन्स यात काय बारीक फरक आहे याची माहिती घेऊ या..
भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही 1 रुपयांत पीकविमा दिला : कृषिमंत्री कोकाटे
कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिला जातो. यात काही मर्यादा असतात. गंभीर आजार किंवा दीर्घकालीन आजारांना यात शक्यतो संरक्षण मिळत नाही. कुटुंबातील सदस्यांनाही मर्यादित संरक्षण मिळते. बहुतांश कॉर्पोरेट प्लॅन फ्लोटर आधारावर काम करतात आणि कुटुंबातील सदस्यांना मर्यादित संरक्षण प्रदान करतात.
कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स मध्ये प्री एक्सिस्टंट मेडिकल कंडीशनसाठी कव्हरेज मर्यादित असू शकते. तसेच या इन्शुरन्समध्ये हाय डीडक्टीबल असतात ज्यामुळे उपचार अधिक खर्चिक ठरू शकतात.
पर्सनल हेल्थ इन्शुरन्स तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार खरेदी करू शकता. कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा इन्शुरन्स करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला वेगवेगळा प्रिमियम (Insurance Premium) भरावा लागेल. वैयक्तिक किंवा परिवाराच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अधिक लवचिकता मिळते. याबरोबरच वैयक्तिक इन्शुरन्समध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य सुविधांबाबत अधिक सुरक्षित राहू शकता.
Budget 2025 : विमा क्षेत्रात शंभर टक्के विदेशी गुंतवणूक, अर्थमंत्री सितारामण यांची मोठी घोषणा