Download App

भयंकर! हजारो तरूण आंधळे होत आहेत; डोळ्यांवर ‘कॉर्नियल ब्लाइंडनेस’चं संकट, तज्ज्ञांचा इशारा

Corneal Blindness Rising In Indian Youth : आजच्या युगात दृष्टीचं संरक्षण करणे (Health Tips) केवळ गरजेचंच नाही, तर अत्यंत आवश्यक बनलं आहे. मोबाईल, लॅपटॉप, स्क्रीन यांचं वाढतं प्रमाण, प्रदूषण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष – या सगळ्यामुळे डोळ्यांचं नुकसान (Eye) अपरिहार्य बनत आहे. विशेषतः एक गंभीर आजार, कॉर्नियल ब्लाइंडनेस. जो पूर्वी वृद्धांमध्ये (Corneal Blindness) अधिक दिसून येत असे, तो आता तरुणांमध्येही वेगाने वाढत आहे.

तरुणांमध्ये वाढत्या अंधत्वाची चिंता
नुकतीच नवी दिल्लीत पार पडलेली इंडियन सोसायटी ऑफ कॉर्निया अँड केराटो-रिफ्रॅक्टिव्ह सर्जन (ISCKRS) ची राष्ट्रीय परिषद या चिंतेच्या पार्श्वभूमीवर भरवण्यात आली होती. देशभरातील प्रमुख नेत्रतज्ज्ञांनी टीव्ही नाईनसोबत बोलताना एक गंभीर इशारा दिला, 30 वर्षांखालील तरुणांमध्ये कॉर्नियल अंधत्वाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. एम्स दिल्लीचे प्रा. डॉ. राजेश सिन्हा यांच्या मते, दरवर्षी सुमारे 20 ते 25 हजार नवीन रुग्ण कॉर्नियल अंधत्वाचे निदान घेत आहेत, यातील बहुसंख्य रुग्ण हे तरुण आहेत. डोळ्यांमध्ये किरकोळ दुखापत, जळजळ, लालसरपणा किंवा संसर्ग याकडे दुर्लक्ष केल्यास दृष्टी कायमची हरवण्याचा धोका असतो.

रशियन तेल खरेदीसाठी भारताला अमेरिकेचा पाठिंबा होता; खळबळजनक खुलासा, रशियानेही सुनावलं

कॉर्नियल अंधत्व म्हणजे काय?

डोळ्याचा पारदर्शक भाग म्हणजेच कॉर्निया. याला इजा झाल्यास, संसर्ग झाल्यास किंवा योग्य पोषण न मिळाल्यास तो खराब होतो. त्यातून कॉर्नियल ब्लाइंडनेस उद्भवतो. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण, जे शेती किंवा कारखान्यांमध्ये काम करतात, त्यांना डोळ्याला इजा होण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा हे लोक घरगुती उपायांवर अवलंबून राहतात, ज्यामुळे संसर्ग वाढतो. अंधत्व टाळता न येणाऱ्या टप्प्यावर पोहोचतो.

मुख्य कारणं कोणती?

– व्हिटॅमिन ए ची कमतरता – अजूनही अनेक मुलं आणि किशोरवयीन मुलामुलींमध्ये ही समस्या आढळते.
– वेळेवर नेत्रतपासणीचा अभाव – अनेकांना डोळ्यांची नियमित तपासणी करावी याची जाणीव नसते.
– माहितीचा अभाव – डोळ्यांवरील सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं.
– सुरक्षेची साधने वापरली जात नाहीत – कामाच्या ठिकाणी सुरक्षा चष्म्याचा अभाव हे मोठं कारण आहे.

आरबीआय व्याज दरात किती कपात करणार?, उद्या ग्राहकांना मिळणार आनंदवादर्ता?

उपचार आणि गरज

भारताला दरवर्षी सुमारे 1 लाख कॉर्नियल प्रत्यारोपणांची गरज आहे, परंतु प्रत्यक्षात फक्त 40,000 शस्त्रक्रिया होतात.
– नेत्रदान करणाऱ्यांची संख्या कमी
– प्रशिक्षित शल्यचिकित्सकांची कमतरता
– दर्जेदार नेत्रपेढींचा अभाव

 परिषदेने काही महत्त्वाच्या गोष्टी सुचवल्या

– पुढील 5 वर्षांत 1,000 नवीन कॉर्निया तज्ज्ञ डॉक्टर तयार करावेत.
– प्रत्येक राज्यात 50-100 नेत्रपेढ्या उभाराव्यात.
– टेलिमेडिसिन, मोबाईल नेत्र क्लिनिक्स यांच्या साहाय्याने ग्रामीण भागात पोहोचावे.
– शाळांमध्ये नियमित नेत्र तपासणी सुरू करावी.
– तरुणांना सुरक्षा चष्मे, हेल्मेट अन् इतर डोळ्यांचं संरक्षण करणारी साधनं उपलब्ध करून द्यावीत.
– नेत्रदानाबद्दल जनजागृती निर्माण करावी.

 

follow us