Crackers History : मुघलांनी की, आणखी कुणी भारतात फटाके आणले कुणी? इतिहास काय?

firecrackers Diwali सण फक्त दिवेच नाही तर फटाक्यांने देखील साजरा करत आनंद लुटला जातो. त्यामुळे दिवाळी निमित्त जाणून घेऊ फटाक्यांचा इतिहास...

Firecrackers

Firecrackers

Did the Mughals or anyone else bring firecrackers to India? Know the history of firecrackers being burst on Diwali : दिव्यांनी घर-अंगण उजळून काढणारा दिवाळीचा सण आलाय. यामध्ये फक्त दिवेच नाही तर फटाक्यांच्या आतषबाजीने देखील सण साजरा करत आनंद लुटला जातो. फक्त भारतात दिवाळीच नाही. तर जगभरामध्ये अनेकदा आपला आनंद व्यक्त करण्यासाठी फटाक्यांचा वापर केला जातो.मात्र या फटाक्यांचा शोध कुठे लागला? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यावर काही इतिहासकार म्हणतात की, मुघलांनी फटाक्यांचा वापर सुरू केला. ज्याचे काही दाखल दिले जातात. त्यामुळे दिवाळी निमित्त जाणून घेऊ फटाक्यांचा इतिहास…

सुपरस्टार महेश बाबू उद्या प्रदर्शित करणार ‘जटाधारा’ चा धमाकेदार ट्रेलर

बीबीसी या वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार भारतामध्ये प्राचीन काळापासूनच आतषबाजी तसेच विविध आवाजांची यंत्रं होती. 2000 हून अधिक जुन्या भारतीय पुराणांमध्ये त्याचा उल्लेख मिळतो. त्याचबरोबर इसवीसन पूर्वकाळातील कौटिल्य म्हणजेच चाणक्य यांच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकांमध्ये देखील याचा उल्लेख पाहायला मिळतो. त्यामध्ये म्हटलं आहे की, लवकर जळणारं आणि तीव्र मात्र आकर्षक ज्वाला निर्माण करणारं एक चूर्ण होतं. ज्यामध्ये गंधक आणि कोळशाची राख मिसळल्याने त्याची ज्वलनशीलता वाढत होती. मात्र देशभरामध्ये या चूर्णाचा वापर तेव्हा फटाके बनवण्यासाठी केला जात नव्हता. त्यावेळी आनंद साजरा करण्यासाठी लोक आपल्या घरा-दारावर रोषणाई करत होते. त्यासाठी तुपाच्या किंवा तेलाच्या दिव्यांचा वापर केला जात होता. असा देखील उल्लेख आढळतो.

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार का? ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताची पहिली प्रतिक्रिया

याच अहवालामध्ये पंजाब विद्यापीठाचे इतिहासाचे शिक्षक राजीव लोचन यांनी सांगितला आहे की, प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये दिवाळीला दिवे लावून आनंद साजरा केला जात होता. फटाक्यांचा आवाज करून नाही. फटाक्यांची परंपरा चीनवरून आली. चीनमध्ये असं मानलं जातं की, फटाके वाजवल्याने किंवा उडवल्याने वाईट आत्मा आणि दुर्भाग्य नष्ट होऊन भाग्य वाढतं. या ठिकाणहूनच बंगाली बौद्ध धर्म गुरु आतिश दीपांकर यांनीही परंपरा भारतात आणली.

पंतप्रधान मोदी घाबरतात…, ट्रम्प यांच्या दाव्यावर 5 कारण देत राहुल गांधींचा हल्लाबोल

दुसरा दावा असा देखील केला जातो की, फटाके आणि आतषबाजीची सुरुवात मुघलांच्या काळानंतर सुरू झाली. मुघल त्यांच्यासोबत फटाके भारतात घेऊन आले. 13 व्या शतकाच्यामध्ये दिल्लीमध्ये पहिल्यांदा आतषबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

Pune : सिम्बॉयसिसच्या कार्यक्रमात मिसाळांचा अपमान तर, फडणवीसांच्या मंचासमोर आढळला साप

मध्ययुगीन इतिहासकार फरिश्ता त्यांच्या तारीख-ए-फरिश्ता पुस्तकांमध्ये सांगितलं आहे की, मार्च 1258 मध्ये फटाक्यांचा प्रयोग मुघल शासक हुलगु खान यांच्या दुताच्या स्वागतासाठी केला होता. जो सुल्तान नसरुद्दीन मेहमूद यांच्या दरबारामध्ये आला होता. मात्र याबाबत खात्रीशीर दावा देखील केला गेलेला नाही. मात्र अनेक इतिहासकारांकडून याचे दाखले दिले जातात की, मुघलांकडून आतषबाजीसाठी फटाक्यांचा भरपूर वापर केला जात होता. मात्र मुघलच भारतात फटाके घेऊन आले हे असं म्हणणं देखील पूर्णपणे योग्य ठरणार नाही. मात्र गन पावडर किंवा दारुगोळा वापरण्याची टेक्निक मुघल भारतात घेऊन आले एवढे नक्की.

ठाण्यात भाजप-शिंदेंमधील धुसफूस! स्वबळावर लढण्यासाठी भाजपकडून इच्छुकांची चाचणी सुरू

तर प्रोफेसर इक्तेदार आलम खान यांनी इतिहासकार फरिश्ता यांनी दावा केलेल्या फटाक्यांना युद्धात वापरल्या जाणाऱ्या दारुगोळा असल्याचे म्हटलं कारण दिल्लीमध्ये सुलतान फिरोजशहा तुघलकच्या राज्यामध्ये देखील फटाके वापरले जात होते.

Virat Kohli : ‘तुम्ही फक्त तेव्हाच अपयशी ठरता जेव्हा…’, निवृत्ती घोषणा? कोहलीच्या पोस्टमुळे क्रिकेट विश्वात खळबळ

तारीख-ए-फिरोजशाहीमध्ये लिहिलं गेलं आहे की, लग्नाच्या वरातींमध्ये खास करून रात्रीच्या वेळी फटाके उडवले जात होते. तर पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला दारूगोळा वापरण्याची टेक्निक चिनी व्यापारी जहाजांच्या माध्यमातून दक्षिण भारतापर्यंत पोहोचली होती. ज्याचा वापर जमोरीन आणि इतर लोकांनी फटाके बनवण्यासाठी केला. तेव्हा देखील युद्धामध्ये हत्यार म्हणून याचा वापर केला गेला नव्हता. तर काही इतिहासकार सांगतात की, मुघलांच्या अगोदर भारतामध्ये आलेले पोर्तुगीज देखील फटाक्यांचा वापर करत होते. विजापूरचा आली आदिलशहाच्या पंधराशे सत्तरच्या मुजुमुलुम या रचनेमध्ये फटाक्यांचा उल्लेख आढळतो.

Virat Kohli : ‘तुम्ही फक्त तेव्हाच अपयशी ठरता जेव्हा…’, निवृत्ती घोषणा? कोहलीच्या पोस्टमुळे क्रिकेट विश्वात खळबळ

मुघलांनीच भारतामध्ये फटाके आणले असं जरी खात्रीशीर दावा केला जाऊ शकत नसला तरी देखील अनेक इतिहासकारांच्या मते मुघलांच्या काळामध्ये फटाक्यांचा वापर वाढल्याचं सांगितलं जातं. यामधील किंग्स कॉलेज लंडनचे शिक्षक डॉक्टर कॅथरिन बटलर स्कोफिल्ड यांचं देखील म्हणणं आहे की, मुघल आणि त्यांच्या समकालीन राजपूत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा वापर करत होते, या फटाक्यांचा वापर ज्या ऋतूमध्ये किंवा महिन्यांमध्ये जास्त अंधार असायचा त्यावेळी केला जायचा. तसेच मुघल शासक शाहजहां आणि त्यानंतर औरंगजेबच्या काळात विवाह, जन्मदिन, राज्याभिषेक आणि लग्नाच्या वरातींमध्ये फटाके वाजवले जात असल्याचे वर्णन सापडतं. याची काही पेंटिंग्स देखील आढळले आहेत. तसेच दारा शिकोहच्या लग्नामध्ये देखील फटाके वाजवल्याचे पेंटिंगमध्ये पाहायला मिळतं.

मेटा एआयच्या ग्लोबल सेलिब्रिटी व्हॉइस लाईनअपमध्ये सामील होणारी दीपिका ठरली पहिली भारतीय

त्याचबरोबर फटाक्यांच्या इतिहासाचा आणखी एक दाखला मिळतो. तो म्हणजे इतिहासकार आणि मुघल साम्राज्याचे वजीर राहिलेले अबुल फजल यांचं पुस्तक आईन- ए- अकबरीच्या पहिल्या खंडामध्ये म्हटलं आहे की आग आणि प्रकाश यांची पूजा धार्मिक कर्तव्य त्याचबरोबर देवाची स्तुतीकरण असतं. त्यामुळेच 18 व्या आणि 19 व्या शतकामध्ये बंगाल आणि आयोध्या येथे दुर्गापूजन आणि दिवाळी यासारख्या सणांना संरक्षण देत आतषबाजीचं आयोजन देखील केले जात होतं.

श्री सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने ‘निर्धार’ चित्रपटाचे कुतूहल जागवणारे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित…

कॅथरिन बटलर स्कोफिल्ड यांच्या म्हणणं आहे की, अठराव्या शतकाच्या शेवटी दिवाळी आणि आकाशबाजी एक समीकरण बनलं याचा दाखला देणाऱ्या अनेक पेंटिंग्स देखील उपलब्ध आहे. ज्यामध्ये लखनऊ येथे नवाबी पेंटिंग तर मुर्शिदाबाद आणि कोलकाता या ठिकाणी दुर्गा पूजेमध्ये आतषबाजी केल्याचे युरोपियन पेंटिंग्स उपलब्ध आहेत. त्यामुळे मंडळी फटाक्यांचा शोध कोणी लावला किंवा भारतात फटाके कधीपासून आले याची खात्रीशीर माहिती नसली तरी देखील अनेक जुन्या दस्तावेज आणि पेंटिंग्समध्ये भारतामध्ये प्राचीन काळापासून आनंदोत्सव आणि सण उत्सव साजरे करण्यासाठी फटाक्यांचा वापर केला जात असल्याचं दाखले मिळतात यावर मंडळी तुम्हाला काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा.

 

Exit mobile version