Download App

iPhone 15 वर चक्क 11,797 रुपयांचा डिस्काउंट, खरेदीची सुवर्णसंधी

iPhone 15 Discount Offers : कमी किंमतीमध्ये जर तुम्ही देखील प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात

iPhone 15 Discount Offers : कमी किंमतीमध्ये जर तुम्ही देखील प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात एक भन्नाट डिस्काउंट ऑफर जाहीर करण्यात आला आहे. या ऑफरचा फायदा घेत तुम्ही आता तब्बल 11,797 रुपयांच्या डिस्काउंटसह iPhone 15 खरेदी करु शकतात. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी iPhone 15 वर भन्नाट ऑफर देत आहे. या ऑफरनंतर तुम्ही iPhone 15 अवघ्या 58,500 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.

iPhone 15 ऑफर

माहितीनुसार, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Amazon iPhone 15 59,900 रुपयांमध्ये देत आहे. ग्राहक Amazon Pay ICICI बँक कार्ड वापरून 1,797 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकतात. यानंतर या फोनची किंमत 58 हजारांपेक्षा कमी होईल. याच बरोबर या फोनवर तुम्ही दरमहा 2,904 रुपयांपासून सुरू होणाऱ्या नो-कॉस्ट किंवा स्टँडर्ड ईएमआयचा पर्याय देखील निवडू शकता.

iPhone 15 एक्सचेंज ऑफर

तर दुसरीकडे जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर या फोनवर तुम्हाला 56,600 रुपयांपर्यंत फायदा होण्याची शक्यता आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीमध्ये असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला तर या फोनवर तुम्हाला 11,797 रुपयांचा डिस्काउंट मिळणार.

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, भामरागड जिल्ह्यात चार नक्षलींना कंठस्नान

iPhone 15 फीचर्स

iPhone 15 मध्ये 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.1-इंचाचा AMOLED LTPO पॅनेल आहे. हे डिव्हाइस 4nm A16 बायोनिक चिपसेटने सुसज्ज आहे. यात 6 जीबी एलपीडीडीआर 5 रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज आहे. या डिव्हाइसमध्ये 3,349 mAh बॅटरी आहे. तर डिव्हाइसमध्ये 48 एमपी ओआयएस आणि 2x ऑप्टिकल झूमसह 12 एमपीचा कॅमेरा आहे. तर 12 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. यात वेगवेगळे मोड्स आहेत, पोर्ट्रेट, नाईट मोड, एचडीआर सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहे.

follow us