भारतातून 600 टन iPhones अमेरिकेत ‘एअरलिफ्ट’; ट्रम्फच्या टॅरिफ अटॅकने पलटवला गेम

भारतातून 600 टन iPhones अमेरिकेत ‘एअरलिफ्ट’; ट्रम्फच्या टॅरिफ अटॅकने पलटवला गेम

Apple Sent 5 Planes Filled With iPhone From India To US : अमेरिकेच्या टॅरिफचा (Trumps Tariff) फटका बसू नये म्हणून अॅपलने जलद गतीने पावले उचलली आहेत. एका अहवालानुसार मार्चच्या शेवटच्या दिवसांत, ॲपलने (Apple) भारत आणि इतर काही बाजारपेठांमधून आयफोनने (iPhone) भरलेली पाच विमाने अमेरिकेत पाठवली. जेणेकरून 5 एप्रिलपासून लागू होणाऱ्या 10% टॅरिफपासून वाचता येईल. अहवालात म्हटलंय की, ही संपूर्ण कारवाई केवळ तीन दिवसांत पूर्ण झाली. यामुळे अ‍ॅपलची धोरणात्मक गती आणि तयारी समोर येते.

एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याच्या मते, अ‍ॅपलला टॅरिफ टाळायचे होते आणि म्हणूनच मार्चमध्ये हा साठा अमेरिकेला पाठवण्यात आला. त्यांनी सांगितले की, अ‍ॅपल अमेरिकेत अद्याप किंमती वाढवणार नाही, परंतु जर टॅरिफ दीर्घकाळ कायम राहिले तर कंपनीला किंमती वाढवाव्या लागू शकतात.

नारायण राणेंना जेवत असताना अटक… तो क्षण मोबाईलमध्ये सेव्ह, परतफेड करणार; नितेश राणेंचा इशारा कोणाला?

अॅपलने भारत आणि चीनमधील त्यांच्या उत्पादन केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात आयफोन स्टॉक अमेरिकेत पाठवला. ही ‘जलद गतीने पाठवणी’ अशा प्रकारे करण्यात आली की, नवीन टॅरिफ दर लागू होण्यापूर्वी हा स्टॉक अमेरिकेच्या गोदामांमध्ये पोहोचला. आता अमेरिकेत आयफोन्सचा मोठा साठा आहे, तो अनेक महिने विकता येईल.

अमेरिकेत 5 एप्रिलपासून 10% आणि 9 एप्रिलपासून जास्तीत जास्त 54% कर लागू करण्यात आलाय. विशेषतः चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर हा कर लादण्यात आलाय. यामुळे आयफोनसारख्या उत्पादनांची आयात अधिक महाग होणार आहा. त्यामुळे विक्रीच्या किमती वाढवाव्या लागतील आणि अॅपलच्या मार्जिन आणि नफ्यावर परिणाम होईल. हे टाळण्यासाठी अॅपलने आधीच अमेरिकेत घाईने मोठा साठा पाठवला, असं वृत्त इंडिया टुडेने प्रकाशित केले आहे.

‘विरोध करू नका…फुले चित्रपट लवकर प्रदर्शित होऊ द्या’; छगन भुजबळांची हात जोडून विनंती

अॅपलची सध्या भारतात किंवा इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये किरकोळ किमती वाढवण्याची कोणतीही योजना नाही. ती देखील नवीन टॅरिफचा परिणाम कमी करण्यासाठी कंपनीला प्रमुख जागतिक क्षेत्रांमध्ये किमती वाढवण्याचा विचार करावा लागेल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अहवालात पुढे असा दावा करण्यात आलाय की, अॅपल ग्राहकांना विशेषतः अमेरिकेत, तिथे किंमत संवेदनशीलतेचा विक्रीवर परिणाम होऊ शकतो, अतिरिक्त खर्च किती काळ सहन करू शकते? याचे विश्लेषण करत आहे.

या व्यतिरिक्त, आतापर्यंत फक्त बेसलाइन 10 टक्के टॅरिफ लागू झाला आहे. ट्रम्प-युगातील त्याच टॅरिफ फ्रेमवर्क अंतर्गत यापेक्षा जास्त टॅरिफ 9 एप्रिलपासून लागू होणार आहेत. जास्त शुल्क आकारले जाण्याची शक्यता असल्याने, अॅपल त्यांच्या दीर्घकालीन उत्पादन रोडमॅपचे पुनर्मूल्यांकन करण्याची शक्यता आहे.

भारत त्या बदलात मोठी भूमिका बजावू शकतो. अॅपल आधीच देशात अनेक आयफोन मॉडेल्स आणि एअरपॉड्स बनवते. अलिकडच्या वर्षांत निर्यातीत सातत्याने वाढ झाली आहे. नवीन धोरणांतर्गत 54 टक्के टॅरिफचा सामना करणाऱ्या चिनी निर्यातीच्या तुलनेत, भारतीय वस्तूंवर 26 टक्के कमी दराने कर आकारला जाईल. ही तफावत भविष्यात भारतीय उत्पादन अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकते.

अॅपल आधीच भारताच्या स्मार्टफोन निर्यातीत आघाडीच्या योगदानकर्त्यांपैकी एक आहे. अमेरिकेला होणाऱ्या सुमारे 9 अब्ज डॉलर्सच्या शिपमेंटमध्ये त्याचा मोठा वाटा आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, चीन आणि भारतामधील वाढती टॅरिफ तफावत त्याच्या पुरवठा साखळीत विविधता आणण्याच्या आणि चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या अॅपलच्या योजनांना गती देऊ शकते. दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात नमूद करण्यात आलंय की, वाढत्या शुल्काचा परिणाम कमी करण्यासाठी अमेरिका भारतातून आयफोनची मागणी वाढवू शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube