नारायण राणेंना जेवत असताना अटक… तो क्षण मोबाईलमध्ये सेव्ह, परतफेड करणार; नितेश राणेंचा इशारा कोणाला?

नारायण राणेंना जेवत असताना अटक… तो क्षण मोबाईलमध्ये सेव्ह, परतफेड करणार; नितेश राणेंचा इशारा कोणाला?

Nitesh Rane Warning To Uddhav Thackeray : खासदार नारायण राणे (Narayan Rane Birthday) यांचा नुकताच 74 वा वाढदिवस साजरा झाला. यावेळी नितेश राणे यांनी वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाषण केलं. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. 23 ऑगस्ट 2021 रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावर असतानाच पोलिसांनी अटक केली होती. हा क्षण मोबाईलमध्ये सेव्ह आहे. याची परतफेड करणार, तेव्हाच डिलिट करणार असं वक्तव्य नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलंय.

यावेळी बोलताना नितेश राणे म्हटले की, आज व्यासपीठावर पाहिल्यानंतर एकंदरित या दहा वर्षांचा प्रवास माझ्या नजरेसमोर येतो. दहा वर्षांमध्ये खूप काही गोष्टी बदलल्या. कोकण आणि राणे साहेबांमध्ये असलेलं नातं मात्र बदललेलं (Maharashtra Politics) नाही. अचानक समर्थकांची संख्या वाढत चालली आहे. अचानक प्रेम उफाळून यायचं. पण या दहा वर्षात जेव्हा विरोधक बोलायचे, तेव्हा वाटायचं की कोकण पुन्हा राणेमय होणार. लोक प्रत्येक गोष्टी बघत असतात, आठवणीत ठेवतात. योग्य वेळी त्याचं उत्तर देतात.

‘विरोध करू नका…फुले चित्रपट लवकर प्रदर्शित होऊ द्या’; छगन भुजबळांची हात जोडून विनंती

लोकसभा निवडणुकीत राणे साहेब नसते तर रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजप-महायुती जिंकू शकले नसते. हे सत्य आहे. साहेबच होते, ज्यांना जनतेने स्वीकारले. ताकदेचा प्रतिनिधी दिल्लीला पाठवायचा असेल, तर राणे साहेंबाशिवाय आपल्याला पर्याय नाही, असं जनतेला वाटलं. फार आव्हानं आली. कुठेच काहीच कमी पडणार नाही, सगळी सत्ता आपल्याकडे आहे, असं देखील नितेस राणे यांनी म्हटलंय.

साहेबांना जेवणाच्या ताटावरून अटक करण्याचा तो क्षण मी मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. ज्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याचदिवशी डिलिट मारणार. तो क्षण टप्प्याटप्प्याने जवळ आलेला आहे, असं देखील नितेश राणे यांनी म्हटलंय. कोण कुठे जात नाही, सगळ्यांचा हिशोब इथेच होणार. राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, एवढं विश्वासाने सांगतो. आपल्या सगळ्यांची साथ अन् विश्वास महत्वाचं आहे, असं देखील नितेश राणे यांनी स्पष्ट केलंय.

धक्कादायक! वळण घेताना ताबा सुटला, हेलिकॉप्टर हवेतच उलटलं अन्.. पायलटसह 6 जणांंचा मृत्यू

नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर अन् उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यावेळी त्यांना जेवणाच्या ताटावरून उठून अटक केली होती. ही खदखद मनात असल्याचं नितेश राणे यांनी बोलून दाखवली आहे. कोणालाच सोडणार नाही, असं देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे.

साहेब माझ्यासाठी नेहमी मार्गदर्शक राहिलेले आहे. मंत्री झाल्यानंतर माझं पहिलंच अधिवेशन होतं. साहेबांनी मला सगळं समजावून पाठवलं होतं. साहेबांनी असंच राहावं, आम्हाला मार्गदर्शन करत राहावं, अशा सदिच्छा देखील यावेळी नितेश राणे यांनी दिल्या आहेत. वडिलांच्या वाढदिवसनिमित्ताने त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा यावेळी दिला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube