Download App

DRDO मध्ये नोकरीची संधी, ९० जागांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज?

  • Written By: Last Updated:

DRDO ASL Bharti 2024: आज अनेकजण नोकरीच्य शोधात आहेत. मात्र, आज स्पर्धा इतकी आहे की, नोकरी (Job) मिळवणं हे मोठं आव्हान आहे. दरम्यान, तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, डीआरडीओच्या (DRDO) प्रगत प्रणाली प्रयोगशाळामध्ये पदवीधर, तंत्रज्ञ, ट्रेड अप्रेंटि या पदांसाठी पदांसाठी भरती होणार आहे.

Pooja Sawant : पूजा सावंतच्या हातावर सजली मेहंदी, फोटो व्हायरल 

इच्छुक उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात. एकूण ९० जागांवर भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 मार्च 2024 आहे.

पदांची संख्या
DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळेमध्ये अप्रेंटिस पदासाठी 90 जागांची भरती होणार आहे. त्यापैकी ग्रॅज्युएट अप्रेंटिसची १५ पदे, टेक्निशियन अप्रेंटिसची १० पदे आणि ट्रेड अप्रेंटिसची ६५ पदे भरण्यात येणार आहेत.

“आता मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्रीही डुप्लिकेट आणा”; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर अजितदादा म्हणतात… 

शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी पात्र उमेदवारांची पदानुसार शैक्षणिक पात्रता असावी.
पदवीधर अप्रेंटिस मेकॅनिकल इंजिनिअर पदवीधारक असावा.
तंत्रज्ञ प्रेंटिस मेकॅनिकल इंजिनिअर पदवीधाकर असावा.
ट्रेड अप्रेंटिस ITI धाकर असावा.

अधिकृत अधिसूचना –
https://www.drdo.gov.in/drdo/sites/default/files/career-vacancy-documents/advtApprASL21022024.pdf

पगार
निवडलेल्या उमेदवाराला पदानुसार वेतन मिळेल.
पदवीधर अप्रेंटिस – रु. 9000/-
तंत्रज्ञ अप्रेंटिस – रु.8000/-
ट्रेड अप्रेंटिस – रु. 7000/-

अर्ज कसा करू शकता?

पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज करण्याचा पत्ता – संचालक, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (एएसएल), कांचनबाग पीओ, हैदराबाद-500058

अर्ज कोठे मिळेल?
या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी आधी अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जा.

होमपेजवर ‘करिअर्स’ वर क्लिक करा.

‘Engagement of Graduate, Technician and Trade Apprentices In Asl, Hyderabad’साठी अर्ज डाउनलोड करण्यासाठी PDF बटणावर क्लिक करा.

एक प्रत डाउनलोड करा आणि फॉर्मची प्रिंटआउट घ्या.

फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे जोडा आणि स्पीड पोस्टने दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा.

follow us