Ultra-Processed Foods : अल्ट्रा-प्रोसेस फुडच्या सेवनामुळे 32 प्रकारच्या गंभीर आजारांचा धोका संभवू शकतो असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स यांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासातून हे अधोरेखित करण्यात आले आहे. अल्ट्रा-प्रोसेस प्रक्रिया (Ultra Processed food) केलेल्या पदार्थ अनेक प्रक्रियांमधून जातात. तसेच यात रंग, इमल्सीफायर्स, फ्लेवर्स आणि इतर पदार्थ यांचा समावेश होतो. स्नॅक्स, कार्बोनेटेड पेये, साखरयुक्त तृणधान्ये आणि रेडी टू इट आदी पदार्थांचा समावेश आहे. या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते तर, साखर, फॅट किंवा मीठाचे प्रमाण जास्त असते. (Eating Ultra Processed food? You may be prone to 32 diseases)
The BMJ ने प्रकाशित अहवालानुसार संशोधनात जवळपास 10 लाख नागरिकांच्या आरोग्याचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. ज्यात अति प्रोसेस फूडचे सेवन केल्याने 32 प्रकारच्या धोकादायक आजारांचा धोका असल्याचे यात नमुद करण्यात आले आहे. अति-प्रक्रिया केलेले अन्न जास्त प्रमाणात घेतल्यास हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसह मृत्यूचा धोका सुमारे 50 टक्के वाढतो. याशिवाय चिंता आणि सामान्य मानसिक विकार तसेच टाइप 2 मधुमेहाचाही (Type 2 Diabetes) धोका 12 टक्क्यांनी वाढतो असे पुरावे ऑस्ट्रेलिया, यूएस, फ्रान्स आणि आयर्लंडमधील संशोधकांनी समोर आणले आहेत.
निरोगी दातांसाठी आजच ‘या’ सवयी बंद करा…
अभ्यासादरम्यान या पदार्थांचे अति सेवन केल्याने मृत्युचा धोका 21 टक्क्यांनी वाढण्याबरोबरच हृदयविकार, लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेहाचा धोका 40-66 टक्के जास्त वाढण्याबरोबरच झोपेच्या समस्येसह नैराश्याचा धोका 22 टक्क्यांनी वाढतो. त्यामुळे प्रोसेस फुडच्या जाहिरातींवर प्रतिबंध करण्याबरोबरच शाळा तसेच रूग्णालयांच्या आजूबाजूला अशा प्रकारच्या पदार्थांची विक्री करण्यास बंदी घालण्याची गरज आहे, असे मत ऑस्ट्रेलियातील डेकिन युनिव्हर्सिटीच्या सहयोगी संशोधन सहकारी मेलिसा एम लेन यांनी व्यक्त केले आहे.