Parag Agrawal : भारतीयांचा जगभरात दबदबा आहे. जगातील मोठमोठ्या टेक कंपन्यांची कमान भारतीयांच्याच हाती आहे. काही वर्षांपूर्वी अशाच एका मोठ्या कंपनीची कमान भारतीयाच्या हाती होती. त्यावेळी या भारतीयाचा पगार किती होता याचा आकडा ऐकला तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. त्यावेळी या भारतीयाचा पगार होता तब्बल 100 कोटी रुपये. कंपनी एलन मस्कची (Elon Musk) होती. नंतर एलन मस्कने त्यांना कंपनीतून काढून टाकले. नोकरी गेली पण हिंमत कायम होती. आज हाच भारतीय स्वतःची कंपनी चालवत आहे. चला तर मग हा काय किस्सा आहे याची माहिती घेऊ या..
ऑक्टोबर 2022 ची घटना. दिग्गज उद्योगपती एलन मस्कने ट्विटर 44 अब्ज डॉलर्सना खरेदी केले. ट्विटरचा मालक म्हणून मस्क ओळखला जाऊ लागला. यानंतर ट्विटरमध्ये मोठे बदल झाले. ट्विटरचं नाव (Twitter) बदलून एक्स करण्यात आलं. कर्मचाऱ्यांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड पडली. याच दरम्यान ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांना सुद्धा कमी करण्यात आले होते.
सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk झाला 12 व्या मुलाचा बाप! सोशल मीडियावर दिली खुशखबर
पराग अग्रवाल IIT ग्रॅज्यूएट आहेत. ट्विटरचे सीईओ म्हणून पराग अग्रवाल चांगलेच लोकप्रिय होते. या पदावर असताना पराग अग्रवाल यांचे पॅकेज तब्बल 100 कोटी रुपये इतके होते. ब्लूमबर्गचे कुर्ट वॅगनर यांच्या एका पुस्तकानुसार पराग अग्रवाल यांनी एलन मस्कच्या प्रायव्हेट जेटचे लोकेशन ट्रॅक करणाऱ्या अकाउंटला ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट नाकारली होती. ट्विटरच्या अधिग्रहणाआधी ही घटना घडली होती. ज्यावेळी ट्विटर मस्कच्या हातात आले त्यावेळी मस्कने पराग अग्रवाल यांना कंपनीतून कढून टाकले.
कंपनीतून काढून टाकण्यात आल्यानंतर पराग अग्रवाल यांना कंपनीकडून जवळपास 400 कोटी रुपये येणे बाकी होते असे त्यावेळी सांगण्यात आले होते. परंतु त्यांना यातील एक रुपयाही मिळाला नाही. यानंतर पराग आणि अन्य ट्विटर अधिकाऱ्यांनी मस्क यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. जवळपास 1000 कोटी रुपयांच्या मोबदल्यासाठी खटला दाखल करण्यात आला होता.
Twitter is Now X: फक्त ट्विटरच नाही तर ‘या’ 12 कंपन्यांनीही बदलले आहे आपले नाव
पराग अग्रवाल आता AI सेक्टरमध्ये उतरले आहेत. रिपोर्ट्सनुसार आता पराग अग्रवाल यांना नव्या वेंचरसाठी 249 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यांचे स्टार्टअप लार्ज लँग्वेज मॉडेलबरोबर काम करणाऱ्या डेव्हलपर्ससाठी सॉफ्टवेअर तयार करण्यावर भर देत आहे. नवीन सॉफ्टवेअर ओपनएआय चॅटजीपीटीच्या टेक्नॉलॉजीसारखेच आहे. म्हणजेच एलन मस्कने कंपनीतून काढून टाकल्यानंतरही हिंमतीने पराग अग्रवाल यांनी नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे.