Download App

कौटुंबिक जबाबदारीमुळे 10 पैकी 9 व्यावसायिकांना नवीन कौशल्ये शिकण्यात अडथळे, अहवालात मोठा खुलासा

LinkedIn Report : आजच्या काळात  व्यावसायिकांनी त्यांचे करिअर (Career) पुढे नेण्यासाठी नवीन कौशल्ये विकसित (Develop New Skills) करणे खूप गरजेचे

  • Written By: Last Updated:

LinkedIn Report : आजच्या काळात  व्यावसायिकांनी त्यांचे करिअर (Career) पुढे नेण्यासाठी नवीन कौशल्ये विकसित (Develop New Skills) करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे अनेक व्यवसायिक (Professional) नवीन नवीन कौशल्ये शिकण्यासाठी प्रयत्न करतात मात्र देशातील दहा पैकी तब्बल नऊ  व्यावसायिकांना काम आणि कौटुंबिक बांधिलकीमुळे नवीन कौशल्ये शिकता येत नाही असा धक्कादायक खुलासा लिंक्डइनच्या एका नवीन अहवालात (LinkedIn Report) करण्यात आला आहे.

या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, देशातील दहा पैकी नऊ व्यावसायिकांना काम आणि कौटुंबिक बांधिलकीमुळे शिक्षणाला प्राधान्य देता येत नाही त्यामुळे आता अनेक व्यावसायिक त्यांच्या कंपनीमध्ये ‘लाऊड लर्निंग’चा (Learning Out Loud) अवलंब करत शिकण्याची संस्कृती विकसित करत आहे. ‘लाउड लर्निंग’ म्हणजे कामाच्या ठिकाणी तुमच्या शिकण्याच्या महत्त्वाकांक्षेबद्दल बोलणे आणि जाणून घेण्याची प्रक्रिया आहे.

व्यावसायिक नेटवर्क लिंक्डइनच्या नवीन अभ्यासानुसार, भारतातील 91 टक्के व्यावसायिकांना थकवा किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांसारख्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो जे त्यांच्या शिकण्याच्या मार्गात येत आहेत. त्यामुळे अनेक व्यावसायिक अपस्किलिंगमधील अडथळे दूर करण्यासाठी लाऊड लर्निंगकडे वळत आहे.

या नवीन अहवालानुसार भारतातील 79 टक्के व्यावसायिकांचा असा विश्वास आहे की ‘लाउड लर्निंग’ मुळे त्यांच्या करिअरमध्ये वाढ होण्यास मदत होईल. यामध्ये अनुभवी व्यावसायिकांकडून मार्गदर्शन घेणे, करिअरच्या नवीन संधी शोधणे तसेच कंपनीमध्ये इतर माहिती शेअर करणे याचा समावेश आहे.

देशातील नोकऱ्यांसाठी 2030 पर्यंत आवश्यक कौशल्ये 64 टक्क्यांनी बदलण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी नवीन कौशल्ये शिकण्यावर लक्ष केंद्रित करणारे आवश्यक आहे असे लिंक्डइनच्या वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादक आणि करिअर तज्ञ नीरजिता बॅनर्जी यांनी सांगितले.

Jio Down : मोठी बातमी! जिओ डाउन, हजारो लोकांचे इंटरनेट बंद

यामुळेच आता लिंक्डइन व्यावसायिकांना त्यांच्या शिक्षण प्रक्रियेला गती देण्यासाठी नवीन AI  प्रीमियम टूल्स देखील सादर करणार असल्याची माहिती देखील नीरजिता बॅनर्जी यांनी दिली.

Alka Yagnik दुर्मिळ आजाराची शिकार, अचानक श्रवणशक्ती झाली कमी

follow us