Download App

Youtube च्या नियमांत मोठा बदल, लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी मुलांचं वय निश्चित; पालकांनाही जबाबदारी

कोट्यावधी लोकांचं आवडतं यूट्यूबच्या नियमांत गुगल काही महत्वाचे (Youtube Changes Rules) बदल करणार आहे.

Google Changes Youtube Rules : कोट्यावधी लोकांचं आवडतं यूट्यूबच्या नियमांत गुगल काही महत्वाचे (Youtube Changes Rules) बदल करणार आहे. लवकरच या नियमांनुसार यूट्यूब काम करणार आहे. यूट्यूबवर लाइव्ह स्ट्रिमिंगच्या (Youtube Live Streaming) नियमांना आणखी कठोर करण्याचा निर्णय गुगलने घेतला  (Google) आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर कुणालाही लाइव्ह स्ट्रिमिंग करता येणार नाही. लहान मुलांच्या चांगल्या प्रकारे सुरक्षितता देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. जुन्या नियमानुसार यूट्यूबवर लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी किमान 13 वर्षे वयाची अट होती. नव्या नियमात आता वयाची अट 16 वर्षे करण्यात आली आहे. हा नवीन नियम येत्या 22 जुलैपासून लागू होणार आहे.

या नियमाचा अर्थ असा की आता 16 वर्षांपेक्षा कमी वय असणारी मुले यूट्यूबवर लाइव्ह स्ट्रिमिंग करू शकणार नाहीत. लहान मुलांची सुरक्षितता आणि ऑनलाइन प्रेक्षकांशी जोडले गेल्यानंतर मुलांसमोर येणारे धोके कमी करण्याच्या उद्देशाने नियमात बदल करण्यात आला आहे असे यूट्यूबने स्पष्ट केलं. यूट्यूबच्या सपोर्ट पेजवर लिहिलं आहे की हा अपडेट युवक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी आमच्याकडून सुरू असलेल्या कामाचा एक भाग आहे.

सावधान! FB, Instagram अन् यूट्यूब तुमच्यावर ठेवताहेत वॉच; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

नव्या नियमांत सवलत काय

नवीन नियम लागू झाल्यानंतर 16 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना लाइव्ह स्ट्रिमिंगमध्ये येण्याची मुभा असेल मात्र त्यासाठी काही कठोर अटींचं पालन करावं लागेल. अशा मुलांना लाइव्ह स्ट्रिमिंग करताना त्यांच्याबरोबर एखादा मोठा व्यक्ती असला पाहिजे. जर या नियमाचं पालन केलं नाही तर यूट्यूब लाइव्ह चॅट बंद करुन टाकील किंवा लाइव्ह स्ट्रिमिंग पूर्णपणे हटवून टाकण्यात येईल.

पालकांच्या अनुपस्थितीत ज्यांना यूट्यूबवर लाइव्ह स्ट्रिमिंग करायचं आहे त्यांच्यासाठी हा नियम अडचणीचा ठरणार आहे. नव्या नियमानुसार आई वडील किंवा एखाद्या वडिलधाऱ्या व्यक्तीला चॅनेल मॅनेजर म्हणून जोडावे लागणार आहे. यूट्यूबच्या धोरणात हा मोठा बदल चाइल्ड प्रोटेक्शनसाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर आधारीत आहे.

गुगलची मोठी घोषणा! भारतात AI Mode लाँच; डेटा सर्च होणार आणखी सोपं

गुगलचं AI Mode भारतात होणार लाँच

जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलने भारतासाठी एक खास घोषणा केली आहे. Google ने भारतात AI Mode in Search नुकतेच लाँच केले आहे. यामुळे आता युजर्सचा सर्चिंग एक्सपीरियन्स पूर्णपणे बदलणार आहे. युजर्सना पहिल्यापेक्षा जास्त चांगले रिजल्ट याद्वारे मिळतील असा दावा कंपनीने केला आहे. Google ने यासाठी Gemini 2.5 चे कस्टम वर्जन वापरले आहे.

follow us