सावधान! FB, Instagram अन् यूट्यूब तुमच्यावर ठेवताहेत वॉच; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

सावधान! FB, Instagram अन् यूट्यूब तुमच्यावर ठेवताहेत वॉच; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Social Media App : आज सगळं जगच सोशल मीडिया युजर (Social Media APP) झालं आहे. हातात स्मार्टफोन अन् त्यात फेसबूक, इन्स्टाग्राम समीकरण आहेच आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही तुमच्या मित्राशी बोललात आणि नंतर तीच गोष्ट फेसबूक किंवा इन्स्टाग्रामच्या फीडमध्ये दिसते. जर असे घडत असेल तर सोशल मीडिया अॅप्स फक्त तुमच्या पोस्टच नाही तर तुमच्या अख्ख्या लाइफस्टाइलवर नजर ठेवत आहेत. या गोष्टी हवेतल्या नाहीत या संदर्भात एका रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे. कोणकोणते सोशल मीडिया अॅप युजर्सवर पाळत ठेवतात आणि कशा पद्धतीने काम करतात याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

ब्रिटेनच्या रिसर्च फर्म Apteco च्या रिपोर्टमध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. फेसबूक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब यांसारखे अॅप अगदी गुपचूपपणे युजर्सच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. हे अॅप्स तुम्ही केलेले क्लिक, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे लोकेशन इतकंच नाही तर युजर्सची राजकीय विचारसरणी सुद्धआ ट्रॅक करतात.

कोणकोणते अॅप करतात पाळतीचं काम

तुम्हाला नक्कीच धक्का बसेल कारण तुम्ही दररोज जे सोशल मीडिया अॅप वापरता तेच अॅप या यादीत सहभागी आहेत. यामध्ये Facebook, Instagram, Threads, LinkedIn, Pinterest, Amazon, Alexa, YouTube, X (आधी ट्विटर) आणि PayPal या अॅप्सचा समावेश आहे. या अॅप्सच्या माध्यमातून युजर्सचा ब्राउजिंग पॅटर्न, फायनान्शियल डिटेल्स, डिव्हाईसची माहिती इतकेच नाही तर युजर्सच्या फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट देखील रेकॉर्ड केली जाते. या माहितीचा उपयोग युजर्सची डिजिटल प्रोफाइल तयार करण्यासाठी केला जातो. यामुळे युजर्सचा व्यवहार समजण्यात कंपन्यांना मदत मिळते.

WhatsApp वर करता येणार डॉक्युमेंट स्कॅन आणि शेअर; थर्ड पार्टी App ची गरज

युजर्सना नेमका धोका काय

अॅप्सकडून गोळा केली जात असलेली माहितीचा उपयोग फक्त युजर एक्सपीरियन्स सुधारण्यासाठी केला जातो असे काही लोकांना वाटू शकते. पण, वस्तुस्थिती यापेक्षा खूप वेगळी आहे. या माहितीच्या आधारे कंपन्या युजर्सचा व्यवहार तर समजून घेतातच त्याचबरोबर या माहितीच्या मनमानी पद्धतीने वापरही करू शकतात. उदाहरणच द्यायचं झालं तर Cambridge Analytica चं देता येईल. यामध्ये सोशल मीडिया डेटाच्या आधारावर लाखो लोकांच्या राजकीय मतं काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणाची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. या डेटाचा वापर 2016 मध्ये अमेरिकेतील निवडणुकीत केला गेला होता.

सोशल मीडियावर व्यक्त होताना काळजी घ्या

युजर्स या सोशल मीडिया अॅप्सचा वापर करतात. प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर असतेच. या अॅपवर युजर्स तासनतास अडकलेले असतात. या गोष्टी नाकारता येणार नाहीत. या अॅप्सचा वापर तर करायचा पण स्वतःची गोपनियताही राखायची असेल तर काही टिप्स माहिती असणे गरजेचे आहे.

मोबाइलमध्ये एखादे अॅप डाउनलोड करताना परमिशनवर लक्ष ठेवा. नीट माहिती घेतल्यशिवाय अॅपला कोणतीही परमिशन देऊ नका. कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशन यांसारखी परमिशन गरज असेल तेव्हाच द्या. फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन या अॅप्सच्या परमिशनचा आढावा घ्या. कारण नसताना अॅप्सना बॅकग्राउंडमध्ये अॅक्सेस देऊ नका. प्लेस्टोरमध्ये जाऊन डेटा प्रॅक्टिस सेक्शन व्यवस्थित वाचा. अॅप डाउनलोड करताना नेहमी ऑफिशियल प्लॅटफॉर्मवरूनच डाउनलोड करा. याव्यतिरिक्त संबंधित अॅपचे रिव्यू आणि रेटिंग यावरही लक्ष द्या.

सावधान! ChatGPT च्या वापरानं मेमरी अन् क्रिएटिविटीही धोक्यात? नव्या अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड

follow us
  • fb
  • instagram
  • youtube