Government Schemes : शेतामध्ये (Farm)उत्पादित वैरणीचा पुरेसा वापर व्हावा यासाठी सर्वसाधारण सर्व प्रवर्गासाठी (शेतकरी (farmer)/ पशुपालक / सहकारी दूध उत्पादक संस्थाचे सभासद) केंद्र सरकार (Central Govt)पुरस्कृत योजना सुरु करण्यात आली आहे.
Bigg Boss Marathi: घरातील कामांवरुन वर्षाताईंचा निक्कीवर रोख; जान्हवी अन् अभिजीतची होतेय चिडचिड
योजनेसाठी अटी :
– लाभार्थी शेतकऱ्यांकडे कमीत कमी 5 किंवा त्यापेक्षा अधिक पशुधन असणे आवश्यक आहे.
– लाभार्थी शेतकऱ्यांने यापूर्वी या योजनेचा कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय संस्थेकडून लाभ घेतलेला नसावा.
Breaking..! छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश; चकमकीत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा
लाभाचे स्वरुप कसे? :
– 5 ते 15 पशुधनाकरीता 1 अश्वशक्ती विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रासाठी 50 टक्के अनुदान – अनुदानाची अधिकतम मर्यादा रु.6000/- प्रति यंत्र.
– 16 ते 25 पशुधनाकरीता 2 अश्वशक्ती विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रासाठी 50 टक्के अनुदान – अनुदानाची अधिकतम मर्यादा रु.8000/- प्रति यंत्र.
– 25 किंवा 25 पेक्षा जास्त पशुधनाकरीता 3 अश्वशक्ती विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रासाठी 50 टक्के अनुदान – अनुदानाची अधिकतम मर्यादा रु.10,000/- प्रति यंत्र.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय? :
अर्ज करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे
अ) संस्थेसाठी अशी कागदपत्रे सादर करावेत.
– प्रस्ताव केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनूसार विहित नमुन्यामध्ये इंग्रजीत सादर करावा.
– संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत
– विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्र खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याची यादी व त्यांच्याकडील पशुधनाबाबत पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र
– संस्थेचा प्रस्ताव सादर करण्याबाबतचा ठराव
– संचालक मंडळाची यादी.
– घटनेतील उद्देशाची प्रत.
– मागील 3 वर्षाचे लेखापरिक्षण अहवाल
ब) वैयक्तिक लाभार्थीसाठी अशी कागदपत्रे सादर करावेत
– विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा.
– लाभार्थीकडे पशुधन असल्याबाबतचे नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र
संपर्क कार्यालयाचे नाव : आपल्या जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय.
टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.