Government Schemes : राज्याच्या (Maharashtra)अनुसूचित क्षेत्र व अतिरीक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत कुपोषण, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणं यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी गरोदर स्त्रिया (pregnant women)व स्तनदा मातांसाठी भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येते. (Bharat Ratna Dr. A.P.J.Abdul Kalam Amrit Diet Plan)
Ahmednagar दक्षिणमध्ये मतदानाचा टक्का घसरला; विखे की लंके मतदारांचा कौल कोणाला?
योजनेच्या प्रमुख अटी : अनुसूचित क्षेत्र व अतिरीक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधीकरीता एक वेळचा आहार देणे.
Sanjay Leela: ‘हीरामंडी सीझन 2’ बद्दल निर्मात्यांनी सोडलं मौन; म्हणाले, ‘हे एकदाच घडते’
आवश्यक कागदपत्रे : अंगणवाडी/मिनी अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी झालेली प्रत्येक गरोदर स्त्री व स्तनदा माता यांची पडताळणी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या नोंदणीनुसार करण्यात यावी.
या योजनेच्या टप्पा-2 अंतर्गत 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थी बालकांची नोंद अंगणवाडी सेविकेने स्वतंत्र नोंदवही करून नियमितपणे नोंद करावी.
लाभाचे स्वरूप असे : अंगणवाडी / मिनी अंगणवाडीकरीता नियुक्त केलेल्या समितीमार्फत एक वेळच्या पूर्ण चौरस आहारामध्ये – चपाती / भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दुध (साखरेसह), शेगंदाणा लाडू, (साखरेसह), अंडी / केळी / नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गुळ / साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला आदींचा समावेश आहे.
या ठिकाणी संपर्क साधावा : संबंधित अंगणवाडी / मिनी अंगणवाडी
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)