Download App

कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात ? सुनील तटकरेंचे संकेत

Sunil Tatkare On Manikrao Kokate : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे

  • Written By: Last Updated:

Sunil Tatkare On Manikrao Kokate : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात सध्या महायुती सरकार (Mahayuti Government) बॅकफूटवर असल्याने माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिले आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं आहे. त्यांच्याकडून काही चुकीची विधानं गेली आहेत. त्यानंतर त्यांना समज देण्यात आली आहे. पण काल जो प्रकार समोर आला आहे त्यानंतर काय करायचं याचा निर्णय अजित पवार (Ajit Pawar) घेतील असं माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले आहे. माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचे संकेत दिल्याने माणिकराव कोकाटे लवकरच मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.

नेमंक प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक्सवर कृषीमंत्री माणिकारव यांचा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. तर दुसरीकडे मी रमी खेळत नव्हतो तर जाहिरात स्कीप करत होतो असं स्पष्टीकरण माध्यमांशी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

रोहित पवारांची टीका

सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? अशी टीका आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर केली आहे.

मोबाईल असोसिएशनने राज्यात सर्वात मोठी रक्तदानाची लोक चळवळ उभी केली : आमदार संग्राम जगताप 

follow us