माणिकराव कोकाटे यांना अजूनही गोष्टी…कृषीमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार भडकले

माणिकराव कोकाटे यांना अजूनही गोष्टी…कृषीमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार भडकले

Ajit Pawar on Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत असतात. अशाच आशयाचं वक्तव्य त्यांनी नुकतच केलं आहे. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. (Kokate) ते म्हणाले, काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात. कोकाटेंना अजून गोष्टी मनात ठेवायची सवय नाही, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल करून त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.

Video : कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी; मोकाट वक्तव्य करत कोकाटेंनी फोडलं दादांवर खापर

माणिकराव कोकाटेंना अजूनही गोष्टी मनात ठेवायची सवय नाही. आता मला जास्त महागात पडतंय. शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी बोलणं योग्य नाही. याबाबत मी मागेही त्यांना सांगितलं होतं. शेतकरी हा बळीराजा आहे, आपला पोशिंदा आहे. सगळ्या गोष्टी आम्हालाही माहीत आहेत, आम्हीसुद्धा शेतकरी आहोत. परंतु, काही गोष्टी बोलून का दाखवायच्या? मनात ठेवायच्या, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.

कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आणि मला हे खातं दिलंय असं वक्तव्य कोकाटे यांनी केलं होत. यावरून जोरदार टीका व्हायला लागल्यानंतर मी असं काही बोललोच नाही असं ते म्हणाले. राज्यात बऱ्याच ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. फळबागांचं नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काही भागात कांद्याच्या पिकाचंही नुकसान झालं आहे अशी सारवासारव त्यांनी केली.

नागालँडमधील ७ आमदारांबाबत काय म्हणाले?

नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या सात आमदारांबाबत बोलताना अजित पवार काय म्हणाले की, गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार मला भेटायला आले होते. त्या आमदारांची तेथे काहीही कामे होत नव्हती. त्यानंतर तेथील मुख्यमंत्र्यांबरोबर मी देखील बोललो होतो. त्या आमदारांमध्ये अस्वस्थता होती ही गोष्ट खरी आहे. पण आज आणि काल दोन दिवस मी आजारी होतो. त्यामुळे आता मी नागालँडमधील त्या आमदारांबाबत अधिक माहिती घेत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube