Download App

Ahmednagar दक्षिणमध्ये मतदानाचा टक्का घसरला; विखे की लंके मतदारांचा कौल कोणाला?

Ahmednagar South Lok Sabha Constituency राज्यात चौथ्या टप्यातील निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली.

Vote Percentage decrease in Ahmednagar South Lok Sabha Constituency : राज्यात चौथ्या टप्यातील निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने मतदार राजाने उत्साहपूर्ण वातावरणात मतदान देखील केले. मात्र हे सगळं सुरु असताना नगर दक्षिणेमध्ये ( Ahmednagar South Lok Sabha) काही तालुक्यात मतदानाचा टक्का ( Vote Percentage) घसरला तर काही ठिकाणी अनपेक्षितपणे वाढ देखील झाली. महायुतीकडून सुजय विखे ( Sujay Vikhe) यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून निलेश लंके असा थेट सामना या लोकसभेत रंगला.

घाटकोपर होर्डिंग अपघात : 14 जणांचे नाहक बळी, दुर्घटनेत बचावलेला प्रवीण सांगतोय आपबीती LIVE

मतदान झाले मतदारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले मात्र अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या व अटीतटीच्या या सामन्यात कोण बाजी मारणार हे येत्या चार जून रोजी स्पष्ट होईल. तत्पूर्वी कोणत्या तालुक्यात किती टक्के मतदान झाले व ज्या ठिकाणी मतदानाचा टक्का घसरला याचा फटका उमेदवारांना बसणार का? तसेच वाढलेलं मतदान कोणाला तारणार तर कोणाला पाडणार हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू…

Sanjay Leela: ‘हीरामंडी सीझन 2’ बद्दल निर्मात्यांनी सोडलं मौन; म्हणाले, ‘हे एकदाच घडते’

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले अन अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीकडून पुन्हा एकदा सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडीनंतर तसेच राजकीय नाट्यानंतर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाली. सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या या लढतीमध्ये चुरस निर्माण झाली. महायुतीतून मविआमध्ये सहभागी झालेल्या लंके यांनी मतदार संघ पिंजून देखील काढण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर उमेदवारी मिळण्यापूर्वीच विखेंनी देखील मतदार संघामध्ये आपला जनसंपर्क वाढवला होता. प्रचाराला सुरुवात झाली व आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्णी, सभांमधून थेट हल्लाबोल करत हि निवडणूक राजकीय दृष्ट्या दोन्ही उमेदवारांसाठी तसेच ज्येष्ठ नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली गेली.

वामिका-अकाय बाबतच्या ‘त्या’ गोष्टीबद्दल विराट-अनुष्काने मानले पापाराझींचे आभार!

अखेर सोमवारी मतदानप्रक्रिया पार पडले. मात्र गेल्या 2019 च्या तुलनेत 2024 ला मतदानाचा टक्का घसरला असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. 2019 च्या निवडणुकीत नगर दक्षिणेत 64.79% मतदान झाले होते तर 2024 ला यामध्ये काहीशी घट आली असून 63.77% टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 63.77 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक राहुरी : 69.79 तर त्याखालोखाल कर्जत जामखेड : 65.80, पारनेर 63.97 टक्के, शेवगाव : 62.74 , श्रीगोंदा : 62.54 तर सर्वाधिक कमी मतदान हे नगर शहरात झाले असून ते 57.60 टक्के एवढे झाले.

Rohit Saraf: रोहित सराफने ‘इश्क विश्क रिबाउंड’ पोस्टर रिलीज करुन सांगितली चित्रपटाची रिलीज डेट

नगर शहरात सकाळपासून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत होता तो दुपारपर्यत काहींसावा कमी झाला मात्र सायंकाळच्या सुमारास तो पुन्हा एकदा वाढला होता. मतदान केंद्राबाहेर असलेली मोठी रांग पाहता अनेकांनी मतदान नन करताच घराच्या दिशेने पाऊले वळवली. तर दुसरीकडे राहुरी, कर्जत – जामखेड व पारनेरमध्ये सर्वाधिक मतदान झाले. पारनेरमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी काहीसा गोंधळ देखील झाला होता मात्र तरी देखील नागरिकांनी मतदानाला प्रोत्साहन देत आपली हजेरी लावली.

शहरात सर्वाधिक कमी मतदान

महायुतीचे घटक पक्ष म्हणून नगर शहराची जबाबदारी शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे होती. त्याचबरोबर नगर शहरात विद्यामान खासदारांच्या कार्यक्रालात अनेक विकासकामे झाली. यामुळे नगरमधील जनता मोठ्या उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र सर्वाधिक कमी मतदान हे नगर शहरात पडले आहे. तर राहुरीमध्ये सर्वाधिक मतदान पार पडले.

सात लाखाहून अधिक मतदार मतदानापासून वंचित

पुढील महिन्यात चार तारखेला मतमोजणी झाल्यानंतर नगर दक्षिणेस खासदार मिळणार आहे. नगर दक्षिण लोकसभेत एकूण 19 लाख 81 हजार 866 मतदार आहेत. त्यापैकी सुमारे 12 लाख 63 हजार 781मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर एकूण 7 लाख 18 हजार 85 मतदार हे मतदानापासून वंचित राहिले. याची टक्केवारी पहिली असता 63.77% टक्के मतदान झाले. दरम्यान मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी हजेरी लावली होती. मात्र, फारसा जोर दिसला नाही. उन्हाची तीव्रता कमी होत गेल्याने दुपारी चारनंतर नागरिकांची संख्या पुन्हा वाढली. मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या.

राहुरी – कर्जत – जामखेडमध्ये कोणाला लीड मिळणार

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये नगर दक्षिणेमध्ये राहुरी तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले तर त्याखालोखाल कर्जत – जामखेडमध्ये मतदानाची आकडेवारी मोठी होती. राहुरीमध्ये विखेंसाठी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले तर लंकेसाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जोर लावला होता. तर कर्जत – जामखेडमध्ये विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी विखेंसाठी मोठी मतपेरणी केली होती, तर प्रतिस्पर्धी असलेले लंकेच्या बाजूने युवा आमदार रोहित पवार हे देखील सरसावले होते. दोन्ही मतदार संघात मतदान चांगले झाले मात्र जनता कोणाला साथ देणार हे मात्र येणार काळच ठरवेल…

follow us