पक्ष पंधरवाड्यामध्ये श्राद्ध केलं पण पिंडाला कावळा शिवेना! कावळे गायब होण्याची कारणं काय?
Crow हा पितरांचा संदेशवाहक म्हणून ओळखला जातो. पण सध्या परिसरात खुप शोधल्यानंतर देखील कावळेच पाहायाला मिळत नाहीत कावळ्याची संख्या का घटली?

Pakshpandharvada Shradhavidhi no Crow found in premises due to Decrease Number : सध्या पक्ष पंधरवाडा सुरू आहे. त्यामुळे आपल्या सगळ्याच्याच घरी पुर्वजांना म्हणजेच पितरांना जेऊ घातले जात आहे. पण पितर जेऊ घालताना कावळा या पक्षाचं विशेष महत्त्व आहे. त्यात पिंडाला कावळा शिवणार नाही. असे डायलॉग तुम्ही जुन्या मराठी चित्रपट मालिकांमध्ये ऐकले असतील. कारण मृत्यूनंतरच्या विधींमध्ये कावळा हा पितरांचा संदेशवाहक म्हणून ओळखला जातो. ही झाली धार्मिक प्रथा पण सध्या हा विधी करण्यासाठी परिसरात सहजा सहजी किंवा खुप शोधल्यानंतर देखील कावळेच पाहायाला मिळत नाहीत. असं अनेक जण म्हणत आहेत. त्यामुळे श्राद्ध आणि पितृपक्षातील विधींमध्ये कावळ्याची भूमिका काय? आणि हे कावळे अचानक गायब का झाले? हे जाणून घेऊ सविस्तर…
अभिजीत सावंतचं पहिलं गुजराती गाणं रिलीज; नवरात्रीसाठी चाहत्यांना खास सरप्राईज
पितृपक्षात पंधरा दिवस पुर्वजांबाबत आदर व्यक्त करत. दान, धर्म, महालय श्राध्द तसेच तर्पण विधी केले जातात.हे सर्व पितरांपर्यंत पोहचवण्यासाठी कावळा या पक्षाचं योगदान मानलं जात कारण कावळा हा पितरांचा संदेशवाहक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पिंड आणि जेवणाचे ताट हे कावळ्याने खाने म्हणजे ते पितरांपर्यंत पोहचल्याचे मानले जाते.
फुकट्यांचे ‘गोल्डन डे’ ज संपणार; फडणवीसांनी ‘बटव्या’तून काढलं कायमचं सोल्युशन
तर मृत्यूनंतर 10 व्या दिवशी केल्या जाणाऱ्या विधीमध्ये कावळ्याने पिंडाला शिवल्यास संबंधित मृतव्यक्तीला मोक्ष मिळाला असं मानलं जातं. तसे न झाल्यास त्याची काही इच्छा अपुर्ण राहिली आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाते. तरीही कावळा न शिवल्यास दर्भाचा कावळा करून त्याचा पिंडाला काकस्पर्श केला जातो. मात्र हा सर्व जरी धार्मिक मान्यातांचा विषय असला तरी देखील पिंडाला कावळा न शिवण्यामागे मोठं कारण आहे ते म्हणजे अचानक घटलेली कावळ्यांची संख्या ज्याला अनेक कारणं आहेत.
‘दशावतार’ कथा कोकणाची, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची! उद्धव ठाकरेंकडून दशावतारचं कौतुक
जगभरात कावळ्यांच्या ३० ते ३५ प्रजाती आहेत. त्यापैकी सहा ते सात प्रजाती भारतात आढळतात. पुर्वी मोठ्या संख्येनी आढळणारे हे पक्षी हळुहळु दिसेनासे होऊ लागले आहेत. कावळ्यांची संख्येत लक्षणीय घट झाली असल्याचे पहायला मिळत आहे.वाढत्या शहरीकरणामुळे आधी चिमण्यांचे आणि आता चिमण्यापाठोपाठ कावळ्यांचे अस्तित्वही धोक्यात आल्याचे चित्र सध्या अनेक भागात पहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षात शहरीकरणात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पशुपक्षांचे नैसर्गिक अधिवास कमी व्हायला सुरवात झाली आहे. त्यामुळे कावळ्यांची संख्या कमी होत असल्याचे पक्षी निरीक्षक सांगातात.
मनोज जरांगेंनी इंग्रजी शिकून रिझर्वेशनच स्पेलिंग शिकावं; हाकेंनी थेट मर्मावरच बोटं ठेवलं
कचरा कुंड्यामधील शिळे अन्न, मृत प्राणी यांचे भक्षण करून कावळे वास्तव करत असत, मात्र नागरीकरणामुळे कचरा कुंड्या बंदिस्त झाल्या, उकीरडे नामशेष झाले. त्यामुळे कावळ्यांच्या कुपोषणाला सुरवात झाली. त्यामुळे कावळ्यांची संख्या घटण्यास सुरवात झाली आहे. कावळ्यांना घरटी करण्यासाठी उंच आणि घनदाट सावली देणारी वृक्ष हवी असतात, शहरांच्या विस्तारीकरणात अशी मोठी झाडे तोडली जातात. त्यामुळे घरटी बांधण्यासाठी कावळ्यांना जागाच उपलब्ध होत नाहीत, याचा परिणाम कालांतराने तेथील कावळ्यांच्या संख्येवर होत जातो. कावळ्यांची संख्या मागील अनेक कारणापैकी हे देखील एक कारण असल्याचे पक्षी निरीक्षक सांगतात.
‘मना’चे श्लोक’चं निमित्त अन् गौतमी गीतकार; देशपांडे भगिनी पहिल्यांदाच एका पडद्यावर!
तसेच आपण नेहमीच पेस्ट कंट्रोल केले जाते. त्यात उंदीर मारण्यासाठी विषारी औषधांचा वापर केला जातो, नंतर मेलेले उंदीर उघड्यावर टाकले जातात, या मेलेल्या उंदरांच्या शरिरात विषारी द्रव्य तसेच राहतात, अशा उंदीरांचे मास खाल्ल्याने कावळ्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे कावळ्यांची संख्या कमी होत आहे.असं देखील काही पक्षी मित्र सांगतात. हे कावळे नामशेष होण्याची आणखी काही कारण तुम्हाला माहिती आहेत का?