मनोज जरांगेंनी इंग्रजी शिकून रिझर्वेशनच स्पेलिंग शिकावं; हाकेंनी थेट मर्मावरच बोटं ठेवलं

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे. यावरून लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केलाय.

  • Written By: Published:
Laxman Hake On Manoj Jarange Patil

Laxman Hake On Manoj Jarange Delhi Announcement : मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगेंनी आता चलो दिल्लीची घोषणा केली आहे. जरांगेंच्या या घोषणेवर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) जरांगेंच्या मर्मावर बोट ठेवतं थेट आव्हान दिले आहे. जरांगे पाटील यांनी दिल्ली नाही तर, अमेरिका अथवा आफ्रिकन देशांमध्ये जावं. तिथे जाऊन आरक्षणाचं ज्ञान पाजळावं असा सल्ला देत जरांगेंनी इंग्रजी शिकून रिझर्वेशनच स्पेलिंग शिकावं असे चॅलेंजही हाकेंनी जरांगेंना दिलं आहे. हाकेंच्या या चॅलेंजवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता असून, जरांगें यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जो मनोज जरांगेंना समर्थन देईल त्याला पाडा; नागपुरातून भूजबळांचा थेट आदेश

दिल्लीवाल्यांना तू काय दाखवतो

जरांगेच्या चलो दिल्लीच्या घोषणेवर बोलताना हाके म्हणाले की, दिल्लीवाल्यांना तू काय दाखवतोय ताकद टोटल देशाच्या लोकसंख्येत तुमची ताकद किती? किती टक्का तुमचा ? असे प्रश्नदेखील हाकेंनी उपस्थित केले. महाराष्ट्रातला ओबीसी सोड जर देशातला ओबीसी एक झाला तर, तुझं काय होईल हे बघ असेही हाके म्हणाले. तुझं ज्ञान अफाट आहे त्यामुळे तू दिल्लीला कशाला जातो तिकडे अमेरिकेला तुझी गरज असल्याचे सांगत
इंटरनॅशनल आरक्षण पॉलिसीचा अभ्यास करण्याचा सल्लाही हाकेंनी जरांगे पाटलांना (Manoj Jarange) दिला आहे. जगामध्ये 119 देशांमध्ये आरक्षण दिलं जातं. त्यामुळे तू दिल्लीच्या लायकीचा नाही तू अमेरिकेच्या लायकीचा आहे, तो तिकडे जा असे हाकेंनी जरांगेंच्या चलो दिल्लीवर बोलताना म्हटले आहे.

भिकारी अवलाद, जयंत पाटील काहीतरी गडबड …, आमदार पडळकरांची पुन्हा जीभ घसरली

चलो दिल्लीचा नारा काय म्हणाले जरांगे

चलो दिल्लीची हाक देणाऱ्या जरांगेंनी याबाबत बोलताना सांगितले की, दिल्लीला आमची मागणी किंवा मोर्चा असं काहीही नसून, छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकेपार झेंडा लावले, तेव्हा आमचे भाऊ विखुरले गेले. मराठा समाज दिवदमणच्या बेटापर्यंत विखुरला गेला असून, आमची भावाभावांची भेट झाली पाहिजे, आम्हाला एकमेकांना भेटून मिठी मारायची असल्याचे जरांगे म्हणाले. देशात 27-28 कोटी मराठा असून, दिल्लीत मराठ्यांचे अधिवेशन होणार यात देशाबाहेरील मराठी पण एकत्र येतील असे सांगत त्यादिवशी आम्ही मराठा समाजाची सभा घेणार, त्यादिवशी मराठा एकत्र येणार असे जरांगेंनी सांगितले.

4 पिढ्या घाबरल्या पण आता बोलणार आणि आंदोलन करणार, लक्ष्मण हाके पुन्हा आक्रमक भूमिकेत

लवकरच तारीख जाहीर करणार

मुंबईत धडकणाऱ्या जरागें पाटलांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. मात्र, दिल्लीत मराठा समाजाचे अधिवेशन नेमकं कधी होणार याची तारखेची घोषणा केलेली नाही. लवकरच तारखेची जाहीर केली जाईल. आम्ही देशभर माणुसकीचं आणि आपुलकीचं नाते जोडणार आहोत. दिल्लीत एकत्रित जमल्यावर जगाच्या पाठीवर पहिली शक्ती अशी एकवटणार जी सर्वांचेच डोळे पांढरे करणारी असेल असे सांगत मी देशातला मराठा एकत्र आणणार असल्याचेही जरांगेंनी म्हटलं आहे.

follow us