Download App

विधानभवनात राड्यानंतर स्थापन होणार एथिक्स कमेटी; सभापती राम शिंदेंची मोठी घोषणा

Ram Shinde Exclusive : विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी लेट्सअप मराठीला (Letsupp Marathi) दिलेल्या एक विशेष मुलाखतीमध्ये

  • Written By: Last Updated:

Ram Shinde Exclusive : विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी लेट्सअप मराठीला (Letsupp Marathi) दिलेल्या एक विशेष मुलाखतीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करत कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे या मुलाखतीमध्ये बोलताना राम शिंदे यांनी भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाबद्दल देखील प्रतिक्रिया दिली आहे.

लेट्सअप मराठीशी बोलताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले की, विधानभवनाच्या परिसरात सभापती आणि अध्यक्षांचा कायदा चालतो. या प्रकरणात सभागृहात देखील चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील या प्रकरणात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच दोन्ही आमदारांनी या प्रकरणात माफी देखील मागितली आहे. दोन्ही आमदारांनी या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केल्यानंतर प्रकरण संपले आहे. पण पूर्वीचे सभागृह आणि आताचे सभागृहात मोठा बदल झाला आहे.

मीडियाच्या माध्यमातून जे काही दाखवण्यात आले ते सर्व जनतेने बघितलं आहे. जो राडा झाला ते सभागृहाला शोभणारा नाही. एक आमदार तीन-चार लाख लोकांचा प्रतिनिधीत्व करुन सभागृहात येतात. त्यामुळे सभागृहात लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळाले पाहिजे. असं या मुलाखतीमध्ये सभापती राम शिंदे यांनी म्हटले आहे.

संयुक्त एथिक्स कमेटी स्थापन होणार

तसेच लवकरच विधानसभा आणि विधान परिषदेसाठी एक संयुक्त एथिक्स कमेटी (Ethics Committee) स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी या मुलाखतीमध्ये बोलताना दिली. पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की, आमदार गोपीचंद पडळकर माझेच कार्यकर्ते आहे. पडळकर आधी विधान परिषदेत होते आता विधानसभेत आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून असे प्रसंग टाळले गेले पाहिजे. पडळकर चांगले काम करत आहे म्हणूनच ते निवडून आले आहे. असं देखील या मुलाखतीमध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले.

सर्वात मोठी बातमी, ऑपरेशन सिंदूरवर संसदेत 29 जुलैपासून चर्चा 

तर या मुलाखतीमध्ये मी आता सभापती असल्याने मला सभापतीप्रमाणे काम करावे लागत असून मला आमदार आणि मंत्र्यांप्रमाणे भूमिका घेता येत नाही. असेही या मुलाखतीमध्ये राम शिंदे म्हणाले.

follow us