Download App

Government Schemes : नाबार्ड डेअरी लोन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

डेअरी फार्मिंग योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना व्याजाशिवाय कर्ज देणे, जेणेकरुन ते सहजपणे आपला व्यवसाय चालवू शकतात.

Government Schemes : दुग्ध पालन योजनेंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना स्वयंरोजगार (Self Employed)उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. डेअरी फार्मिंग योजनेचा (Dairy Farming Scheme)मुख्य उद्देश म्हणजे लोकांना व्याजाशिवाय कर्ज देणे, जेणेकरुन ते सहजपणे आपला व्यवसाय चालवू शकतात. तसेच दुधाच्या उत्पादनासाठी चालना द्यावी जेणेतकरुन आपल्या देशातून बेरोजगारीचे (Unemployment)प्रमाणात घट होऊन ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

मोदी- मेलोनींचा फोटो पुन्हा चर्चेत; 8 फोटो ज्यांनी इंटरनेटचं ट्रॅफिक वाढवलं

नाबार्ड डेअरी लोन योजनेसाठी पात्रता :
1 लाभार्थी उमेदवार शेतकरी असावा.
2 असंघटित क्षेत्र
3 उद्योजक
4 बिगर सहकारी संस्था
5 संघटित गट
6 कंपन्या
India’s Best Dancer 4: अभिनेत्री करिश्मा कपूर दिसणार जजच्या खुर्चीत; लवकरच घेऊन येणार नवा शो

डेअरी फार्मिंग योजनेंतर्गत कर्ज देणाऱ्या संस्था कोणत्या?
1 राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक
2 राज्य सहकारी बँक
3 प्रादेशिक बँक
4 व्यावसायिक बँक
5 अन्य संस्था

योजनेसाठी आर्थिक निकष :
– चांगल्या जातीसाठी एका जनावरांची किंमत – 50,000 रुपये.
– दुधाची किंमत प्रति लिटर 32 रुपये
– प्रति किलो हिरव्या चाऱ्याची किंमत दोन रुपये.
– प्रति किलो सुक्या चाऱ्याची किंमत पाच रुपये.
– देखभाल व पशुसंवर्धन खर्च (दर वर्षी) प्रति युनिट दोन हजार रुपये.
– संतुलित जनावरांच्या चाऱ्यासाठी प्रतिकिलो किंमत 20 रुपये.
– पशुसंवर्धन बांधकामासाठी प्रत्येक चौरस फुटांची किंमत 250 रुपये.
– प्रतिबॅग विक्रीतून मिळणारे उत्पन्न 20 रुपये.

योजनेच्या अटी काय?
या योजनेंतर्गत एखाद्या व्यक्तीस सर्व घटकांसाठी मदत मिळू शकते, परंतु तो अर्जदार प्रत्येक घटकासाठी फक्त एकदाच पात्र असेल.
या योजनंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना मदत केली जाऊ शकते आणि त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पायाभूत सुविधांसह स्वतंत्र युनिट स्थापित करण्यासाठी स्वतंत्र युनिट स्थापन करण्यास मदत दिली जाते.
अशा दोन प्रकल्पांमधील कमीत कमी 500 मीटर अंतर असले पाहिजे.
या योजनेंतर्गत एखादी व्यक्ती फक्त एकदाच त्याचा लाभ घेऊ शकेल.

योजनेच्या लाभासाठी अर्ज कुठे करावा?
सर्वप्रथम तुम्हाला जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
अर्जदाराच्या कर्जाची रक्कम मोठी असल्यास त्या व्यक्तीस त्याचा डेअरी प्रकल्प अहवाल नाबार्ड कार्यालयाकडे द्यावा लागेल.
जर तुम्हाला एखादे छोटे डेअरी फार्म सुरु करायचे असल्यास, तुम्हाला जवळच्या बँकेत जाऊन माहिती मिळवू शकता.
बँकेत गेल्यानंतर तुम्हाला सबसिडी फॉर्म भरावा लागेल आणि त्यात या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.

डेअरी फार्मिंग योजना हेल्पलाईन :
Office Address: Plot C-24, G Block, Bandra Kurla complex,
BKC Road, Bandra East, Mumbai, Maharashtra 400051
Helpline Number: (022) 26539895/96/99
Email Id: webmaster@nabard.org

टीप : वरील योजनेच्या नियमांमध्ये किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीसाठी सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करुन घ्यावी.

follow us

वेब स्टोरीज