Download App

Government Schemes : राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : प्रत्येक वर्षी विद्यापीठ राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती (Rajarshi Shahu Maharaj Scholarship)तसेच विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना सुरु करत असते. विविध समाजातील विद्यार्थ्यांसाठी (Student)या शिष्यवृत्ती योजना सुरु केल्या जातात. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिली जाते. विद्यापीठाच्या इतर शिष्यवृत्तींपैकी (Scholarship)राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती महत्वाची असते. विद्यापीठाच्या नियमानुसार आपण कोणताही एकच अर्ज करु शकता.

जाळपोळीची घटना घडली तेव्हा कुटुंब..; क्षीरसागरांनी सांगितला अंगावर काटा आणणारा ‘तो’ प्रसंग

योजनेसाठी नियम व अटी :
– राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ही फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू असेल.
– राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी तुमच्या उत्पन्नाची कोणतीही अट राहणार नाही.
– राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी केवळ तुमची गुणवत्ता हाच निकष राहील.
– ही शिष्यवृत्ती तुम्हाला मागील परीक्षेत किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक असेल.
– तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरवण्यासाठी तुमचं पदवीचं वय 25 तर पदव्युत्तर अभ्यासक्रमातील वय हे 30 पेक्षा अधिक नसावे.

Tara Sutaria : तारा सुतारियाच्या इंडो-वेस्टर्न लुकनं इंटरनेटचा पारा चढला

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कसा मिळेल?
तुमच्या गुणवत्तेनुसार या शिष्यवृत्तीचा लाभ तर मिळणार. यामध्ये 48 टक्के तुमच्या गुणवत्तेनुसार योजनेचा लाभ असेल आणि 52 टक्के तुमच्या आरक्षणानुसार योजनेचा लाभ मिळेल. यामध्ये तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा. तुम्ही तुमच्या नियमित अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असला पाहिजे.

शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
1 चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
2 मागील वर्षाचे मार्कशीट
3 आधार कार्ड
4 बँक पासबुक (आधार कार्डला लिंक असणारे)
5 कॉलेजचा तुमचा एलीजीबीलिटी नंबर
6 जातीचा दाखला
7. 75 टक्के उपस्थिती पत्रक

योजनेचा लाभ कसा होतो?
त्या-त्या विभागानुसार तुम्हाला 6000 ते 16000 शिष्यवृत्ती दिली जाते.

या योजनेच्या अनुषंगाने शासनाकडून घातलेल्या अटी व शर्ती विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहेत.
या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा अंतिम अधिकार शासनाला असणार आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यास भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
शैक्षणिक संस्थेतील वस्तीगृह व भोजन शुल्क यांच्या आकारणीप्रमाणे खर्च दिला जातो.
शैक्षणिक संस्थांमधील वस्तीगृह व भोजन शुल्क हे या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पूर्ण दिले जातात.

या ठिकाणी संपर्क साधावा :
आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण अधिकारी कार्यालय, तसेच समाज कल्याण आयुक्त 3, चर्च रोड , पुणे 411001

Tags

follow us