Download App

अबब! भारतात चारपैकी एक जोडपं लठ्ठ; नव्या अभ्यासात खुलासा अन् धोक्याची घंटा..

Obesity in Indian Couples : लग्नानंतर वजन वाढणे एक सामान्य बदल नाही तर यामागे अनेक कारणे असू शकतात. ICMR च्या एका सर्वेत या समस्येबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अशात आपल्याला हे जाणून (Obesity in Indian Couples) घेणे गरजेचे आहे की लग्नानंतर वजन का वाढत जाते आणि या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करता येईल.

लठ्ठपणा शरीरात प्रमाणापेक्षा जास्त चरबी जमा होते. बॉडी मास इंडेक्स सामान्य (Body Mass Index) पातळीपेक्षा जास्त होतो. साधारणपणे बीएमआय 23 पेक्षा जास्त असणे म्हणजे लठ्ठपणा मानला जातो. खराब लाईफस्टाईल, फास्ट फूडचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन, शारीरिक हालचालींची कमतरता, अपुरी झोप आणि वाढता तणाव या कारणांमुळे लठ्ठपणा वाढतो.

ICMR च्या अभ्यासानुसार देशातील प्रत्येक चार जोडप्यांत एक जोडपे लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत. मोठी शहरे आणि श्रीमंत वर्गात या समस्येने विक्राळ रूप धारण केलं आहे. यामुळे लाईफस्टाईलसंबंधी आजारांचा धोका वाढू लागला आहे. लठ्ठपणा फक्त वाढलेल्या वजनाशी संबंधित नाही तर यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होतात. यामुळे हृदयाचे आजार, उच्च रक्तदाब, टाइप 2 डायबिटीस, फॅटी लिव्हर, विविध प्रकारचे कॅन्सर अशा आजारांचा धोका वाढतो.

भारतात कॅन्सरपेक्षाही लठ्ठपणा धोकादायक; पण, जगासाठी ‘या’ आजाराची डोकेदुखी, अहवाल उघड

वजन वाढल्याने सांध्यांवर परिणाम होतो. यामुळे गुडघे आणि कमरेत वेदना कायम जाणवत राहतात. लठ्ठपणामुळे झोपेत अडथळा (स्लिप एपनिया) समस्या तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात. लठ्ठपणामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते. यामुळे रोजच्या कामात आळस आणि थकवा जाणवतो. यामुळे डॉक्टर या समस्येला हळूहळू वाढणारा धोका समजतात. त्यामुळे ही समस्या वेळीच नियंत्रणात आणली नाही तर गंभीर रूप धारण करू शकते.

जोडप्यांत वजन वाढण्याची कारणे काय

लग्नानंतर जोडप्यांत लठ्ठपणाची समस्या सामान्य होऊन जाते. याचे महत्वाचे कारण म्हणजे पती पत्नी एकमेकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आत्मसात करतात. बाहेरचे खाणे, वेळी अवेळी खाणे, कॅलरी युक्त खाद्यपदार्थ आणि गोड पेय यांचे आहारातील प्रमाण वाढते. जबाबदारी वाढल्याने व्यायाम होत नाही. शारीरिक हालचाली कमी होतात. वर्कआऊट आणि एक्सरसाईज यांसाठी वेळ काढणे कठीण होऊन जाते. अपुरी झोप आणि वाढलेला तणाव यांमुळे सुद्धा वजन वेगाने वाढत जाते.

अभ्यासात असेही दिसून आले आहे की शहरी आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंबात ही समया समस्या अधिक दिसून येते. कारण त्यांचे लाईफस्टाईल कमी शारीरिक मेहनत आणि अधिक कॅलरी युक्त खाद्यपदार्थांचे सेवनाशी संबंधित असते.

लठ्ठपणा रोखण्यासाठी काय कराल

घरी बनवलेले हेल्दी अन्न पदार्थ खा. जंक फुडचे सेवन कमी करा.
दररोज कमीत कमी अर्धा तास शारीरिक व्यायाम करा किंवा वर्क आउट करा.
रात्री उशिरा जेवण करण्याचे टाळा. दररोज जेवणाच्या वेळा ठरवून घ्या आणि त्यानुसार आहार घेत चला.
पुरेशी झोप घ्या आणि तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन करा.
वेळोवेळी वजन आणि बीएमआय (BMI) चेक करत राहा.

सावधान! भारतात ‘या’ दोन कॅन्सरचा वेगाने फैलाव; अहवालात धक्कादायक खुलासा

follow us