भारतात कॅन्सरपेक्षाही लठ्ठपणा धोकादायक; पण, जगासाठी ‘या’ आजाराची डोकेदुखी, अहवाल उघड

Obesity Problem in India : भारतात लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. या लठ्ठपणामुळेच (Obesity) अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. या गोष्टीची जाणीव झाल्याने आता लोकांकडून काळजी घेतली जात आहे. डाएट आणि व्यायामावर भर दिला जात आहे. अशातच एक धडकी भरवणारा अहवाल आला आहे. लॅन्सेटच्या 2024 मधील अहवालानुसार भारतातील 70 टक्के शहरी लोकसंख्या लठ्ठपणा किंवा जास्त वजनाच्या कॅटेगरीमध्ये आहे. भारतातील 30 मिलियन लोक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. यानंतर आता देशात लठ्ठपणाबाबत काळजी वाढू लागली आहे.
लठ्ठपणा मोठी समस्या
ईप्मोस हेल्थ सर्विस रिपोर्ट 2024 समोर आला आहे. या अहवालातही काही धक्कादायक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. या अहवालानुसार भारतात 47 टक्के लोक कॅन्सर (Cancer) आणि 28 टक्के लोक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. परंतु कॅन्सरने चिंतीत असणाऱ्या लोकांच्या संख्येत घट दिसून आली आहे. दुसरीकडे लठ्ठपणाच्या बाबतीत काळजीत असणाऱ्या लोकांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे.
लठ्ठपणाने चिंतीत असणाऱ्या लोकांच्या संख्येत मागील एक वर्षाच्या काळात 14 टक्के वाढ झाली आहे. तर कॅन्सरच्या बाबतीत काळजीत असणाऱ्या लोकांच्या संख्येत 12 टक्क्यांनी घट झाली आहे. लठ्ठपणाला अडचणीचे मानणाऱ्या लोकांची संख्या चार वर्षांत तीन पटीने वाढली आहे. मागील एक वर्षाच्या काळात तर ही संख्या 14 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर पोहोचली आहे.
उन्हाळ्यातील आय स्ट्रोक अन् कायमचा अंधपणा; कशी काळजी घ्यावी वाचा सविस्तर…
फिटनेसच्याबाबतीत भारतीयांत आता जागरूकता आली आहे. तसेच लठ्ठपणाकडे गांभीर्याने पहिले जात आहे. इप्सोस हेल्थ सर्विस रिपोर्ट तयार करण्यासाठी 31 देशांतील जवळपास 23 हजार लोकांवर सर्वे केला. यामध्ये 2200 भारतीयांशी चर्चा केली.
उपचाराच्या बाबतीत लोकांना काळजी
रिपोर्टनुसार देशातील 25 टक्के लोक उपचारांना लागणारा वेळ आणि 25 टक्के स्टाफच्या अभावाने त्रस्त आहेत. 44 टक्के लोकांना वाटते की देशातील हेल्थ केअर सुविधा चांगल्या आहेत. तर 15 टक्के लोकांनी हेल्थ केअर सुविधा चांगल्या नाहीत असे म्हटले आहे. तसेच 62 टक्के लोकांचे म्हणणे आहे की देशात अनेक लोक असे आहेत ज्यांना आरोग्य सुविधांचा खर्च करणे शक्य होत नाही.
महिलांत कोणता आजार अधिक
महिलांचा आरोग्याबाबत या अहवालात काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. मानसिक आरोग्याच्या बाबतीत (Mental Health) महिलांचे काय म्हणणे आहे याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. देशातील 13 ते 28 वर्षे वयोगटातील 55 टक्के महिला मानसिक आरोग्या बाबत काळजीत असतात. रिपोर्टच्या हिशोबाने जगात एकूण 51 टक्के महिला मानसिक आरोग्याच्या समस्येचा सामना करत आहेत. पुरुषांमध्ये हा आकडा 10 टक्क्यांनी कमी आहे.
मानसिक आरोग्य सर्वात मोठी समस्या
जगभरात मानसिक आरोग्यानंतर (Mental Health) कॅन्सर या आजाराला सर्वात चिंताजनक मानले गेले आहे. जगभरात जवळपास 38 टक्के लोक कॅन्सरने पीडित आहेत. रिपोर्ट नुसार इटलीत कॅन्सरच्या बाबतीत काळजीचं वातावरण आहे. इटलीत हे प्रमाण 56 टक्के आहे.
इंजेक्शन, टॅब्लेट की लिक्वीड… औषध घेण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?