सावधान! भारतात ‘या’ दोन कॅन्सरचा वेगाने फैलाव; अहवालात धक्कादायक खुलासा

सावधान! भारतात ‘या’ दोन कॅन्सरचा वेगाने फैलाव; अहवालात धक्कादायक खुलासा

ICMR Cancer Report : देशात कॅन्सर या घातक आजाराचे रुग्ण वेगाने (ICMR Cancer Report) वाढत चालले आहेत. आजाराचे उशिराने होणारे निदान आणि खर्चिक उपचार यांमुळे मृत्यूंचा आकडाही वाढत चालला आहे. देशात अनेक प्रकारचे कॅन्सर वेगाने (Cancer in India) फैलावत आहेत. हे कोणते कॅन्सर आहेत याबाबत आयसीएमआरने एक रिपोर्ट जारी केला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती नमूद करण्यात आली आहे.

देशात अजूनही कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी पुरेशी व्यवस्था नाही. आजारावरील उपचार अतिशय महागडे आहेत. त्यामुळे गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना उपचार करणे शक्य होत नाही. कॅन्सरवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांची संख्या सुद्धा कमी आहे. एम्समध्ये कॅन्सरवरील उपचारांची व्यवस्था आहे. येथे रुग्णसंख्येचा लोड खूप जास्त आहे. त्यामुळे रुग्णांना दीर्घकाळ वाट पहावी लागते. परिणामी रुग्णाची स्थिती अधिक गंभीर होते.

Joe biden Cancer : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कर्करोगाचे निदान 

ICMR च्या अहवालात नेमकं काय

आयसीएमआरच्या (भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद) अहवालानुसार सन 2020 मध्ये देशात 13.9 लाख कॅन्सरचे रुग्ण होते. आता 2025 मध्ये रुग्णांची संख्या 15 लाखांपर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच रुग्णसंख्येत 12 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या देशात दोन प्रकारचे कॅन्सर अतिशय वेगाने वाढत आहेत. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि पुरुषांत तोंडाचा कॅन्सर वेगाने वाढत आहे. याव्यतिरिक्त फुप्फुसांचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, सर्वाइकल कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर, त्वचेचा कॅन्सरही भारतात वेगाने वाढत आहे. आजार वेगाने वाढण्यामागे काही कारणेही आहेत.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बिघडलेली लाइफस्टाइल, जेनेटिक कारणे आणि पर्यावरणही एक रिस्क फॅक्टर आहे. प्रदूषणही अनेक प्रकारच्या कॅन्सरला आमंत्रण देणारे ठरत आहे.

कॅन्सर वाढण्याची कारणे काय

मॅक्स रुग्णालयातील ऑन्कोलॉजी विभागातील डॉ. रोहित कपूर सांगतात, महिलांत ब्रेस्ट कॅन्सर सर्वात कॉमन आजार आहे. या पाठीमागे काही कारणे आहेत. जसे की उशिरा झालेला विवाह, गर्भधारणेतील विलंब, तणाव, बदललेली जीवनशैली, लठ्ठपणा ही कारणे आहेत. पुरुषांत तोंडाचा कॅन्सर वेगाने वाढतो आहे. यामागे तंबाखूचे सेवन, स्मोकिंग, पान खाणे, दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे अशी काही कारणे सांगता येतील. प्रदूषण, आरोग्यासाठी नुकसानदायक आहार आणि बदललेली जीवनशैली हे देखील घटक कॅन्सर वाढण्यास कारणीभूत आहेत.

काय सांगता! आता AI करणार कॅन्सरची तपासणी; एका थेंबातूनच कळणार आजाराचा पत्ता

follow us
  • fb
  • instagram
  • youtube