Air Pollution : सध्या देशभरातील अनेक शहरांत प्रदूषणाची समस्या अतिशय (Air Pollution) गंभीर झाली आहे. राजधानी दिल्लीत तर श्वास घेणे (Delhi Pollution) सुद्धा कठीण झाले आहे. प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण अनेक प्रकारे शरीराचे नुकसान करते. याचा सर्वाधिक परिणाम फुप्फूसांवर होतो. पण तुम्हाला माहीत आहे का की या प्रदूषणाचा डोळ्यांवर देखील गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे ड्राय आय सिंड्रोम आणि आय स्ट्रोक यांसारख्या समस्या होऊ शकतात. आय स्ट्रोक (Eye Stroke) डोळ्यांची एक गंभीर स्थिती आहे. हा एक गंभीर आजार आहे जो डोळ्यांच्या रक्त वाहिन्यांमध्ये समस्या निर्माण झाल्यास होऊ शकतो. हा आजार नेमका काय आहे, याची माहिती तज्ज्ञांकडून घेऊ या..
गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयाच्या ऑप्थमोलॉजी विभागातील डॉ. सुची वर्मा सांगतात, आय स्ट्रोक एक गंभीर आजार आहे जो प्रदूषणामुळे होतो. प्रदूषणामुळे डोळ्यांना रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये सूज आणि रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता असते. या आजाराचे दोन प्रकार आहेत. आयस्केमिक आय स्ट्रोक या प्रकारात रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. यामुळे डोळ्यांना रक्त पुरवठा कमी होतो. दुसऱ्या हेमोरेजिक आय स्ट्रोक प्रकारात डोळ्यांच्या रक्त वाहिन्या फुटल्याने डोळ्यांत अतिरिक्त रक्त पुरवठा होतो. ही स्थिती डोळ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. प्रदूषणामुळे असे प्रकार होण्याची शक्यता कमीच असते. परंतु तरीही प्रदूषणापासून डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहेच.
धक्कादायक! शर्मा नव्हे सिद्दीकी.. कित्येक वर्षांपासून भारतात वास्तव्य; पाकिस्तानी कुटुंबाचा भांडाफोड
आय स्ट्रोकच्या उपचारासाठी औषधे, शस्त्रक्रिया, लेजर थेरपी, ऑक्सिजन थेरपी, फिजियोथेरपी यांची मदत घेतली जाते. हा आजार फक्त प्रदूषणाने नाही तर डायबिटीस (Diabetes) आणि लठ्ठपणा यांमुळे (Obesity) देखील होऊ शकतो.
डोळ्यांत वेदना, धूसर दिसणे, डोळे लाल होणे, डोळे सुजणे, डोकेदुखी आणि मानसिक तणाव
सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात मोबाईल आणि कॉम्प्युटरचा वापर प्रचंड वाढला आहे. लोकांचा स्क्रीन टाईम बेसुमार वाढला आहे. यांमुळे डोळे खराब होत आहेत आणि प्रदूषणाने या समस्येत वाढच झाली आहे. प्रदूषणामुळे ड्राय आय सिंड्रोम आजार वाढत चालला आहे. डोळ्यांत जळजळ आणि खाज येण्याची लोकांची तक्रार वाढली आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे.
स्वतः नेहमी हायड्रेट राहा. जास्तीत जास्त पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही याची काळजी घ्या.
प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे देखील त्रासदायक ठरू शकतं. तेव्हा दिवसातून किती पाणी पिले पाहिजे हे तुमच्या डॉक्टरांकडून माहिती करून घ्या.
मोबाईल किंवा टीव्ही पाहत असाल तर मधूनमधून ब्रेक घेत चला. रात्री पुरेशी झोप घ्या. झोपण्याआधी जास्त वेळ मोबाईल पाहू नका.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एखादा चांगला आय ड्रॉप देखील वापरू शकता.
सावधान! प्रदूषणामुळे ‘या’ आजाराचा गंभीर धोका; जाणून घ्या, कसे राहाल सुरक्षित..