Download App

कोणत्या वयात खरेदी कराल हेल्थ इन्शुरन्स? ‘या’ गोष्टी पक्क्या लक्षात ठेवाच!

आरोग्य विम्यात वय हा एक महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे तुम्हाला किती वयात आरोग्य विमा खरेदी केला पाहिजे हे महत्वाचे आहे.

Health Insurance : आजच्या धावपळीच्या आणि फास्ट फूडच्या जमान्यात अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. कोणत्या आजाराचे कधी आक्रमण होईल याचा काही अंदाज नाही. कोरोना संकटाच्या काळात याची प्रचिती आलीच आहे. त्यामुळे आरोग्य विमा असणे (Health Insurance) अत्यंत गरजेचे बनले आहे. यामुळे चांगल्या आणि दर्जेदार उपचारांची हमी मिळते. कितीही खर्चिक उपचार असले तरी तुम्हाला त्याची काळजी करण्याची काहीच गरज राहत नाही.

आरोग्य विम्यात वय हा एक महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे तुम्हाला किती वयात आरोग्य विमा खरेदी केला पाहिजे असा प्रश्न उपस्थित होतो. आरोग्य विमा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे अनेकांना माहिती नसते. त्यामुळे फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्या वयात घ्याल हेल्थ इन्शुरन्स?

तुम्ही जितक्या लवकर आरोग्य विमा घेताल तितके तुमच्यासाठी चांगले राहील. कारण तुमच्यासाठी तत्काळ वित्तीय सुरक्षा कवच तयार होते. जर तुमचे वडील किंवा आई नोकरीला असेल तर त्यांना कंपनीकडूनच आरोग्य विमा मिळतो. यामध्ये अनेकदा मुलांचाही समावेश असतो. जर तुमच्याकडे पालकांच्या विम्याचे कवच नसेल तर तुम्ही तत्काळ हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. 25 वर्षांच्या वयानंतर तुमच्याकडे कोणत्याही परिस्थितीत हेल्थ इन्शुरन्स असलाच पाहिजे. कारण वयाच्या या टप्प्यानंतर आजारी पडण्याची शक्यता जास्त वाढते.

Insurance Fraud : 11 कोटींसाठी विद्यार्थ्याचं भयानक पाऊल; तब्बल 10 तास ड्राय आईसमध्ये ठेवले पाय

कमी वयातील इन्शुरन्सचे फायदे

जर तुम्ही कमी वयात हेल्थ इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला कमी प्रीमियम (Premium) द्यावा लागेल. कारण विमा कंपन्या प्रीमियम वय आणि मेडिकल स्थिती पाहून निश्चित करत असतात. कमी वयाबरोबरच मेडिकल हिस्ट्री क्लिअर असेल तर प्रीमियम बराच कमी होतो. वय वाढल्यानंतर अनेक समस्या निर्माण होऊ लागतात त्यामुळं प्रीमियम देखील जास्त राहतो.

कमी वयात पॉलिसी खरेदी केल्यानंतर चांगले कव्हरेज मिळण्याची शक्यता राहते. कमी वयाच्या ग्राहकांसाठी क्लेमचे टेन्शन कंपन्यांसाठी बरेच कमी राहते. त्यामुळे कंपन्या या वर्गासाठी अनेक कव्हरेज ऑफर करतात.

या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवाच

आरोग्य विम्याच्या कव्हरची रक्कम तुमचे बजेट आणि गरजा यांचा विचार करून निश्चित करा.

विम्याच्या हप्त्याच्या दाराची तुलना करा आणि तुमच्या बजेटनुसार दर निश्चित करा.

संबंधित विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो किती आहे हे नक्की तपासून घ्या. कारण यावरून कंपनी किती दावे निकाली काढते आणि विमाधारकाला कोणत्याही त्रासाविना रक्कम मिळते का याचा अंदाज येतो.

तुमच्या खास दिवसाला बनवा सुरक्षित; जाणून घ्या Wedding Insurance चं महत्व

नेटवर्क रुग्णालयांची यादी एकदा चेक करा. तुम्ही राहत असलेल्या परिसरातील रुग्णालय या कंपनीच्या नेटवर्क यादीत असेल तर तुम्हाला आणखी सोपे राहिल.

जर तुम्हाला आधी एखादा आजार असेल तर प्री एक्सिस्टींग डीसिज कव्हरेजची तपासणी नक्की करा.

follow us